Nashik Accidental Death | नाशिकमध्ये रस्त्यांची कामे बनली मृत्यूचा सापळा! अपघातग्रस्त भाजीविक्रेते दिलीप काळे यांची उपचारादरम्यान प्राणज्योत मालवली

Nashik Accidental Death | कुंभमेळा कामांच्या घाईत आणखी एकाचा बळी; सातपूर परिसरातील तिसऱ्या घटनेने नागरिकांचा संताप
Nashik Accident News
ट्रकखाली चिरडून महिलेचा मृत्यू झाला.File Photo
Published on
Updated on

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
नाशिकच्या रस्त्यांवर विकासकामांच्या नावाखाली मृत्यूचा सापळा उभा राहत आहे का? कुंभमेळ्याच्या तयारीसाठी सुरू असलेल्या त्र्यंबकेश्वर रोडच्या कामाने आता आणखी एका कुटुंबाचा संसार उद्ध्वस्त केला.

Nashik Accident News
Nashik FDA Raid | FDA चा मोठा दणका! नाशिक जिल्ह्यात नियम मोडणाऱ्या खाद्य व्यावसायिकांवर कारवाईची कुऱ्हाड

रस्ता सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी असलेल्या यंत्रणेच्या डोळ्यांसमोर महिनाभरापूर्वी चारचाकीच्या धडकेत गंभीर जखमी झालेल्या भाजीविक्रेते दिलीप दामोदर काळे (५५) यांनी बुधवारी (दि. १२) रात्री उपचारादरम्यान अखेरचा श्वास घेतला.

रस्त्याच्या कामाशी संबंधित अपघातांत सातपूर भागातून तीन बळी गेल्यानंतरही प्रशासनाच्या निष्काळजीपणाचा पाढा संपलेला नाही. नागरिकांच्या जीवाची किंमत केवळ कंत्राटी कामांच्या घाईपेक्षा कमी आहे का, असा संतप्त सवाल आता सातपूरकरांकडून उपस्थित होत आहे.

सातपूर राजवाडा परिसरात त्र्यंबकेश्वर रोडचे काम सुरू असताना गेल्या २० जुलै रोजी सायंकाळी दिलीप काळे रस्ता ओलांडत असताना पाठीमागून आलेल्या चारचाकी वाहनाने त्यांना जोरदार धडक दिली. या अपघातात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. त्यांच्यावर नाशिकमधील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते.

गेल्या महिनाभरापासून कुटुंबीय आणि नातेवाईक त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होण्याची वाट पाहत होते. मात्र बुधवारी रात्री उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. दरम्यान यापूर्वी प्रभाकर निकम आणि प्रवीण गायकवाड या दोन कर्त्या पुरुषांचा रस्त्याच्या कामांशी संबंधित अपघातांमध्ये मृत्यू झाल्यानंतर आता दिलीप काळे यांचा मृत्यू झाला आहे.

Nashik Accident News
Nashik Farmer Loan | शेतकरी कर्जमाफीनंतरही नाशिक जिल्हा बँकेची कोंडी कायम; अपेक्षित निधी न मिळाल्याने पेच!

रस्त्याचे काम सुरू असताना वाहनचालक आणि पादचाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक उपाययोजना, योग्य बॅरिकेटिंग, दिशादर्शक फलक आणि वाहतूक नियंत्रणाची व्यवस्था करण्यात आली होती का, असा सवालही उपस्थित केला जात आहे. दिलीप काळे यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, सुना आणि नातवंडे असा परिवार आहे.

नगरसेविकेचे ठिय्या आंदोलन

दिलीप काळे यांच्या अपघातानंतर स्थानिक नगरsevिका सविता काळे यांनी मनपा प्रशासन आणि संबंधित ठेकेदाराला जबाबदार धरत मागील प्रभागात ठिय्या आंदोलन केले होते. कामाच्या ठिकाणी सुरक्षिततेच्या उपाययोजनांचा अभाव असल्याचा आरोप करत त्यांनी संबंधित ठेकेदारावर कारवाई करण्याची मागणी केली होती. दरम्यान, दिलीप काळे यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत मिळावी, तसेच या अपघाताची जबाबदारी निश्चित करून संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी नगरसेविका काळे यांनी केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news