Imtiaz Jaleel Bail | टीसीएस प्रकरणात मोठी घडामोड; इम्तियाज जलील यांना जामीन मंजूर

Imtiaz Jaleel Bail | टीसीएस प्रकरण; 50 हजार रुपयांच्या हमीवर सुटका; न्यायालय परिसरात समर्थकांची गर्दी
Imtiaz Jaleel Bail Nashik TCS Case
Imtiaz Jaleel Bail Nashik TCS Case File photo.
Published on: 
Updated on: 

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
टीसीएस या आयटी कंपनीतील महिला कर्मचाऱ्यांच्या लैंगिक शोषण आणि संबंधित प्रकरणात एमआयएमचे माजी खासदार इम्तियाज जलील यांना गुरुवारी (दि. १९) नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला. सत्र न्यायाधीश अतुल खारकर यांनी ५० हजार रुपयांच्या हमीवर त्यांची जामिनावर सुटका करण्याचे आदेश दिले. या सुनावणीकडे राजकीय आणि सामाजिक वर्तुळाचे लक्ष लागले होते.

Imtiaz Jaleel Bail Nashik TCS Case
PM Awas Yojana | नाशिक जिल्ह्याची राज्यात मोठी झेप! प्रधानमंत्री आवास योजनेत चौथा क्रमांक

या प्रकरणाच्या सुनावणीवेळी सरकारी पक्षातर्फे ॲड. विजय गायकवाड यांनी बाजू मांडली. तसेच तपास अधिकारी आणि विशेष तपास पथकाचे प्रमुख सहायक पोलिस आयुक्त संदीप मिटके हेही न्यायालयात उपस्थित होते. जलील यांना न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याच्या पार्श्वभूमीवर एमआयएमच्या माजी खासदाराच्या समर्थकांनी न्यायालय परिसरात मोठी गर्दी केली होती.

संभाव्य गर्दी आणि कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न लक्षात घेऊन पोलिस यंत्रणेकडून मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. न्यायालय परिसरात पोलिसांकडून परिस्थितीवर लक्ष ठेवण्यात येत होते. जामीन मंजूर झाल्यानंतर न्यायालयाबाहेर पत्रकारांशी संवाद साधताना इम्तियाज जलील यांनी तपासात पोलिस प्रशासनाला संपूर्ण सहकार्य करण्याची भूमिका स्पष्ट केली. यापूर्वीही आपण तपास यंत्रणेला सहकार्य केले असून, यापुढेही करणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी काही राज्यांतील माध्यमांच्या वृत्तांकनावर आक्षेप घेतला.

Imtiaz Jaleel Bail Nashik TCS Case
Nida Khan Divorce Case | निदा खान घटस्फोट प्रकरणाची आज महत्त्वाची सुनावणी; नाशिक कौटुंबिक न्यायालयात काय घडणार?

या प्रकरणाला चुकीचे स्वरूप देण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. माझे नाव इम्तियाज आणि या प्रकरणातील संशयित महिलेचे नाव निदा असल्यामुळेच आमच्याविरोधात वातावरण निर्माण करण्यात आल्याचे चित्र काही माध्यमांनी उभे केले, असे ते म्हणाले.
निदा खान ही आपल्याकडे आली होती. आपण अनेक वर्षांपासून लोकप्रतिनिधी म्हणून तसेच सामाजिक क्षेत्रात सक्रिय असल्याने विविध प्रकारचे लोक समस्या घेऊन भेटत असतात.

त्यांना शक्य ती कायदेशीर मदत आणि योग्य सल्ला देण्याचा प्रयत्न केला जातो. मात्र, एखादी व्यक्ती भेटली म्हणजे तिच्या प्रत्येक चुकीच्या कृत्याचे आपण समर्थन करतो, असा अर्थ होत नाही, असेही जलील यांनी स्पष्ट केले. दरम्यान, या प्रकरणाच्या तपासाकडे सर्वांचे लक्ष लागले असून, न्यायालयाच्या जामीन निर्णयानंतर पुढील तपासाची दिशा महत्त्वाची ठरणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.