Datta Karale transfer Ashok Kaharat case| आयजी दत्ता कराळे यांची उचलबांगडी, खरात प्रकरण भोवले

विशेष पोलिस महानिरीक्षकपदी प्रवीण पडवळ
Ashok Kaharat case
Datta Karale transfer
Published on
Updated on

नाशिक : भोंदू अशोक खरात प्रकरणात चर्चेत असलेले नाशिक विभागाचे विशेष पोलिस महानिरीक्षक दत्ता कराळे यांची अखेर उचलबांगडी करण्यात आली आहे. मानवी हक्क आयोगात त्यांची बदली करण्यात आली असून, त्यांना खरात प्रकरण भोवल्याची चर्चा रंगत आहे. तर नाशिक परिक्षेत्र विशेष पोलिस महानिरीक्षकपदी प्रवीण पडवळ यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

राज्य सरकारने एकाचवेळी राज्यातील २५ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या. यामध्ये अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश आहे. दरम्यान, यात नाशिक विभागाचे विशेष पोलिस महानिरीक्षक दत्ता कराळे यांचेही नाव आहे. भोंदू अशोक खरात याच्यासोबत कराळे यांचे फोटो समोर आल्याने, प्रवीण पडवळ शेअर केले. त्यांच्यावर अनेक गंभीर आरोप करण्यात आले होते.

Ashok Kaharat case
TCS Nashik accused bail rejected |टीसीएस-संशयितांचे जामीन अर्ज फेटाळले

सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी, खरात प्रकरणामध्ये दत्ता कराळे यांचा संबंध असल्याचे काही फोटो आणि व्हिडिओ दत्ता कराळे हे एक आयजी लेव्हलचे पोलिस अधिकारी असतांना, खरातसारख्या बाबाच्या कार्यक्रमात का गेले? तेथे भाषण देखील दिले? हे जेव्हा सामान्य जनता ऐकते तेव्हा खरातवर विश्वास का नाही बसणार, असा सवाल अंजली दमानिया यांनी उपस्थित केला होता.

Ashok Kaharat case
Sadhugram preparation Nashik | साधुग्रामसाठी प्रशासनाकडून तयारीला वेग

एवढंच नाहीतर खरात आणि कराळे यांच्यामध्ये तब्बल १८ कॉल आहेत. याचे उत्तर पोलिस महासंचालक सदानंद दाते यांनी घेतले पाहिजे, असे म्हणत दमानिया यांनी चौकशीची मागणी केली होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news