IAS Officer Ashok Kharat Connection | भोंदू खरात आणि IAS महिला अधिकारीचे गूढ वाढले; खासगी गाडीने सिन्नरला गुपचूप दौरे?

IAS Officer Ashok Kharat Connection | भोंदू खरातला जि. प. कडून कोट्यवधींचा रस्ताही
Ashok Kharat Case
Ashok Kharat CasePudhari
Published on
Updated on

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

भोंदू अशोक खरात याच्याशी आयएएस महिला अधिकाऱ्याचे कनेक्शन समोर आल्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांची एक एक माहिती समोर येऊ लागली आहे. संबंधित महिला अधिकारी आठवड्यातून तीन वेळा सिन्नरच्या दौऱ्यावर जात होत्या. सुरुवातीला अन्य अधिकाऱ्यांना सोबत घेणाऱ्या या अधिकारी नंतर मात्र एकट्याच खासगी वाहनाने या भागात जात असल्याची चर्चा आहे.

Ashok Kharat Case
Nashik Conversion Case | नाशिकमध्ये कंपनीत 'धर्मांतर रॅकेट'? एचआर हेडवरही गुन्हा! तक्रारींकडे दुर्लक्ष करणे पडले महागात

यातच जिल्हा परिषदेतर्फे खरातच्या फार्महाउससाठी कोट्यवधींचा रस्ता दिल्याचे बोलले जात आहे. भोंदू खरात याच्यावर जिल्हा परिषदेने 'मेहेरबानी'चा वर्षाव केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. पर्यटन मंत्रालयाने मीरगावच्या 'ईशान्येश्वर' मंदिराला तीर्थक्षेत्राचा दर्जा देत कोट्यवधींचा निधी ओतल्यानंतर, जिल्हा परिषदेने २०२२-२३ या काळात जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभाग क्र. १ कडून सिन्नर तालुक्यातील मीरगावसाठी एक कोटीहून अधिक रुपयांची तरतूद करण्यात आली.

विशेष म्हणजे, हा निधी सामान्य जनतेच्या विकासकामांसाठी नसून खरातच्या खासगी फार्महाउसच्या रस्त्यांसाठी वापरण्यात आल्याचा खळबळजनक दावा खुद्द अधिकारीच करत आहेत. संबंधित महिला अधिकारी आठवड्यातून तीन वेळा सिन्नरच्या दौऱ्यावर जात होत्या. सकाळी पंचायत समितीत बैठकीचा फार्स आटोपल्यानंतर महिला अधिकारी शासकीय वाहन बाजूला ठेवून खासगी वाहनाने मंदिराकडे जात असल्याची कबुली कर्मचाऱ्यांनी दिली.

Ashok Kharat Case
Nashik Conversion Case | नाशिकमध्ये कंपनीत 'धर्मांतर रॅकेट'? एचआर हेडवरही गुन्हा! तक्रारींकडे दुर्लक्ष करणे पडले महागात

सुरुवातीस काही अधिकारी, कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन जाणाऱ्या महिला अधिकारी नंतर मात्र एकट्याच खासगी वाहनाने जात असल्याचे सांगितले जात आहे. शासकीय बैठकीसाठी जाताना सरकारी वाहन आणि परतीच्या प्रवासासाठी खासगी वाहन वापरण्याचा या महिला अधिकाऱ्याचा प्रताप संशयाच्या भोवऱ्यात आहे. शिर्डी विमानतळाचे निमित्त साधून गायब होण्यामागे नक्की कोणते 'शासकीय' कारण होते, असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.

पास्तेतील जमिनींच्या सातबाऱ्याचा शोध ?

खरातशी असलेल्या या घनिष्ठ संबंधातूनच 'पास्ते' येथील संशयास्पद जमीन व्यवहारांची चर्चा सुरू झाली आहे. काही जागरूक नागरिकांनी या जमिनींचे सातबारे शोधण्यास सुरुवात केली असून, यात आणखी किती बड्या अधिकाऱ्यांची नावे समोर येतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news