Crime News Nashik News | जुन्या सिडकोतील तुळजा भवानी चौकात किरकोळ वादातून एकाच कुटुंबातील तिघांवर कोयत्याने जीवघेणा हल्ला

Crime News Nashik News | तुळजा भवानी चौकातील घटना : हल्लेखोराला अटक
Crime
Crime
Published on: 
Updated on: 

सिडको : पुढारी वृत्तसेवा
जुन्या सिडकोतील तुळजा भवानी चौक परिसरात किरकोळ वादातून शेजाऱ्याने एकाच कुटुंबातील तिघांवर कोयत्याने हल्ला केल्यामुळे पती-पत्नीसह १७ वर्षीय मुलगा गंभीर जखमी झाला. याप्रकरणी अंबड पोलिसांनी संशयित हल्लेखोर श्रावण राबडे याला अटक केली आहे.

Crime
Water Supply Scheme : शहराला आता तीन ते चार दिवसांआड पाणी १८ जलकुंभ कार्यान्वित : सिडको-हडकोत वितरणाला वेग

तुळजा भवानी चौकसात संदीप निकम हे घरासमोरील रस्त्यावर सोमवारी (दि. २) रात्री ९.४५ च्या सुमारास शतपावली करत होते. त्यावेळी शेजारीच राहणारा संशयित श्रावण राबडे याने काहीतरी कारण काढून निकम कुटुंबीयांशी वाद घातला होता. त्यानंतर त्याने जिवे मारण्याच्या उद्देशाने संदीप निकम (५०) आणि त्यांचा मुलगा अर्णव निकम (१७) यांच्या डोक्यावर कोयत्याने वार करून पिता-पुत्राला गंभीर जखमी केले.

पती आणि मुलाला वाचवण्यासाठी मानसी निकम धावून गेल्या असता, श्रावणने त्यांच्यावरही कोयत्याने वार केले. यात पती-पत्नी व मुलगा तिघेही गंभीर जखमी झाले. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे. घटनेची माहिती मिळताच अंबड पोलिस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थल दाखल झाले. मानसी निकम यांच्या फिर्यादीवरून अंबड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी हल्लेखोर श्रावण राबडेला अटक केली असून, सहायक पोलिस निरीक्षक प्रताप गिरी अधिक तपास करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.