Nashik | नाशिक पश्चिममध्ये 'होर्डिग्ज वॉर' टोकाला

राष्ट्रवादीचे होर्डिग्ज झाळल्यानंतर भाजपचे होर्डिग्ज फाडले

'Hordig's War' in Nashik West
नाशिक पश्चिममध्ये 'होर्डिग्ज वॉर' टोकालाfile
Published on
Updated on

नाशिक : तिकिटाची लाॅटरी कोणास लागेल हे सांगणे मुश्किल असले तरी, इच्छुकांकडून तिकिट प्राप्तीसाठी स्वत:ला मिरविण्याची एकही संधी सोडली जात नसल्याचे चित्र आहे. नवरात्रोत्सव जणू काही इच्छुकांच्या पथ्यावरच पडला असून, मतदारांवर शुभेच्छांचा पाऊस पाडण्यासाठी मतदार संघाच्या कानाकोपऱ्यात होर्डिग्ज झळकविले आहेत. त्यातूनच नाशिक पश्चिम मतदार संघात 'होर्डिंग्ज वॉर' रंगला असून, आता तो टोकला गेल्याचे दिसून येत आहे. मंगळवारी (दि.८) राष्ट्रवादी काँग्रेसच्या इच्छुकाचे होर्डिग्ज जाळल्याची घटना ताजी असतानाच, बुधवारी (दि.९) भाजपच्या इच्छुकाचे होर्डिग्ज धारदार शस्त्राने फाडल्याचे समोर आल्याने मतदार संघात तणावपूर्ण शांतता बघावयास मिळत आहे.

आगामी विधानसभा निवडणूक महायुती आणि महाविकास आघाडी अशी लढविली जाणार असल्याने, इच्छुकांची मोठी कोंडी झाली आहे. मविआत मतदार संघ कोणाच्या वाट्याला येईल, हाच प्रश्न असल्याने तिन्ही पक्षातील इच्छुक मतदार संघावर दावा ठाेकून आहेत. तर महायुतीतही इच्छुकांची संख्या मोठी असल्याने, कोणाचा पत्ता कापला जाई अन् कोणाला लॉटरी लागेल यावरून राजकारण रंगले आहेत. नाशिक पश्चिम मतदार संघात प्रत्येक इच्छुक तिकिटासाठी दावा करीत असल्याने, पक्षाअंतर्गतच कोल्ड वॉर रंगल्याचे चित्र आहे. यातून होर्डिग्ज फाडणे अन् जाळण्याचे प्रकार घडत असल्याने मतदार संघात तणावपूर्ण वातावरण बघावयास मिळत आहे. मंगळवारी (दि.८) राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या इच्छुक उमेदवाराचे होर्डिग्ज जाळल्याची घटना ताजी असतानाच बुधवारी (दि.९) भाजप इच्छुकाचे होर्डिग्ज धारदार शस्त्राने फाडल्याचे समोर आले. लागोपाठ दोन दिवस अशाप्रकारच्या घटना समोर आल्याने, मतदार संघात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी अंबड पोलिस ठाण्यात याबाबतची तक्रार दिली आहे.

कार्यकर्त्यांची कोंडी

नाशिक पश्चिम विधानसभा मतदार संघात भाजपकडून सर्वाधिक इच्छुक असून, यातील जवळपास सर्वांनीच संबंध मतदार संघात होर्डिग्ज झळकविले आहेत. काही चौकांमध्ये तर भाजपच्या इच्छुकांचेच होर्डिग्ज आमने-सामने असल्याने मतदारांमध्ये संभ्रम बघावयास मिळत आहे. या सर्व प्रकारात कार्यकर्त्यांची मोडी कोंडी होत असून, एखाद्या इच्छुकाच्या होर्डिग्जवर कार्यकर्त्याचा फोटो झकल्यास दुसरा इच्छुक नाराज होत आहेत.

पक्षाअंतर्गतच व्यक्तीवर संशय

भाजप इच्छुक आणि पदाधिकाऱ्याचे होर्डिग्ज फाडल्याप्रकरणी भाजपच्या सिडको येथील पदाधिकाऱ्याने पक्षाअंतर्गत विरोधकावरच संशय व्यक्त केला आहे. याप्रकरणी पोलिसात तक्रार देणार असून, परिसरातील सीसीटीव्ही तपासण्याचे काम सुरू असल्याचे त्याने स्पष्ट केले आहे. होर्डिग्ज फाडणारे पक्षातीलच असल्याचे त्याने स्पष्ट केल्याने, कुरबुरी वाढण्याची शक्यता आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news