

नाशिक : नागपूर आयआयएम येथे जागतिक बँक साहाय्यित महास्ट्राइड प्रकल्पासंदर्भात शनिवारी (दि. 28) जिल्हाधिकारी यांची कार्यशाळा झाली. यावेळी लोकाभिमुख प्रशासनाच्या उपक्रमांपैकी 100 दिवस अभियानात विशेष योगदान दिल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांचा सन्मान करण्यात आला.
महसूल विभागाने विभागीय आयुक्त डॉ. गेडाम यांच्या अध्यक्षतेखाली 'महसूल विभागाच्या अस्तित्वात असलेल्या संरचनेचा अभ्यास करून सुधारणा सुचवणे' यासाठी समिती नेमली होती. त्या समितीने नुकताच त्यांचा अहवाल शासनास सादर केला आहे. यावेळी नाशिक विभागातील जिल्हाधिकारी जलज शर्मा (नाशिक), आयुष प्रसाद (जळगाव), मिताली सेठी (नंदुरबार) आणि डॉ. पंकज आशिया (अहिल्यानगर) हेही उपस्थित होते.