Homethon Property Expo : 'होमेथॉन प्राॅपर्टी एक्स्पो'मध्ये घरखरेदीची सुवर्णसंधी

18 ते 21 डिसेंबरदरम्यान आयोजन : 4.99 टक्के योजनेचा मिळणार ग्राहकांना लाभ
नाशिक
नाशिक : पत्रकार परिषदेत माहिती देताना सुनील गवादे, जयेश ठक्कर, अभय तातेड, शंतनू देशपांडे, अभय नेरकर आदी.Pudhari News Network
Published on
Updated on

नाशिक : रिअल इस्टेट क्षेत्रातील नाशिककरांसाठी वर्षातील सर्वात मोठा उत्सव म्हणून ओळखले जाणारे नरेडको आयोजित 'होमेथॉन प्रॉपर्टी एक्स्पो २०२५' यंदा भव्य, आकर्षक आणि नागरीकांसाठी फायदेशीर ठरणार आहे. १८ ते २१ डिसेंबर २०२५ या कालावधीत डोंगरे वसतिगृह मैदानावर हे प्रदर्शन भरवण्यात येणार असून, एकाच छताखाली घरखरेदीसाठी लागणाऱ्या सर्व सुविधा, माहिती आणि प्रकल्पांची संपूर्ण शृंखला नाशिककरांना उपलब्ध करून दिली जाणार आहे.

नरेडको नाशिक शाखेचे अध्यक्ष सुनील गवांदे यांनी पत्रकार परिषदेत दिलेल्या माहितीनुसार, मागील दोन प्रदर्शनात लाखो लोकांनी होमेथॉनला भेट दिली. यंदा हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. प्रदर्शनची ब्रँड ॲम्बेसेडर अभिनेत्री श्रुती मराठे आहे. प्रॉपर्टी एक्स्पोचे आकर्षण वाढवण्यासाठी आणि नागरिकांपर्यंत उपक्रमाची विश्वसनीयता पोहोचवण्यासाठी श्रुती मराठे आपली भूमिका पार पाडणार आहे. होमेथॉन एक्स्पोमध्ये नामांकित बिल्डर्स, डेव्हलपर्स, बँका, बांधकाम साहित्य निर्माते आणि इंटिरियर कंपन्या सहभागी होणार आहेत. प्रदर्शन सकाळी १० ते रात्री ८ पर्यंत खुले असणार आहे.

प्रदर्शनात नवीन हाउसिंग प्रोजेक्ट्स, परवडणारे फ्लॅट्स, प्रीमियम व्हिला, कमर्शियल प्रॉपर्टी, प्लॉट प्रोजेक्ट्स, इंटिरियर व बांधकाम साहित्य, गृहकर्जासाठी विविध बँकांच्या योजना एकाच छताखाली उपलब्ध करून दिले जाणार आहे. होमेथॉनमध्ये एसबीआयसह वित्तसंस्था ग्राहकांना त्यांच्या गरजेनुसार मार्गदर्शन करणार आहेत. ग्राहकांना घर बुकिंगसाठी आवश्यक सर्व माहिती, सवलती, योजना आणि दस्तऐवजीकरण याविषयी तज्ज्ञांकडून सविस्तर मार्गदर्शन मिळणार असल्याचे सचिव शंतनू देशपांडे, खजिनदार भूषण महाजन यांनी दिली. प्रदर्शन यशस्वीतेसाठी समन्वयक जयेश ठक्कर, सहसमन्वयक उदय शाह, मार्जियान पटेल, अभय नेरकर, चेअरमन अभय तातेड, सचिव शंतनू देशपांडे, खजिनदार भूषण महाजन, भाविक ठक्कर, पुरुषोत्तम देशपांडे, प्रशांत पाटील, हर्षल पाटील, हर्षल धांडे, प्रसन्न साईखेकर, पवन भगुरकर आदी प्रयत्नशील आहेत.

४.९९ टक्के गृहकर्ज योजनेचे आकर्षण

या वर्षीची सर्वात मोठी ऑफर म्हणून ४.९९ टक्के व्याजदराची विशेष होमलोन स्कीम जाहीर करण्यात आली आहे. ही स्कीम एक्स्पोमधील प्रमुख आकर्षण ठरेल असे प्रदर्शनाचे मुख्य समन्वयक जयेश ठक्कर यांनी सांगितले. सध्या बँकांकडून गृहकर्जावर साधारण ७.७५ ते ८ टक्के व्याजदर आकारला जातो. मात्र या योजनेंतर्गत ग्राहकांना फक्त ४.९९ टक्के व्याज भरावे लागणार आहे. या दरापेक्षा जास्त असलेले अतिरिक्त व्याजची जबाबदारी पझेशन मिळेपर्यंत बिल्डर स्वतः उचलणार आहेत. चार दिवस चालणाऱ्या या प्रदर्शनात जे नागरिक घर बुक करतील, त्यांनाच या विशेष ऑफरचा लाभ मिळणार आहे, असेही जयेश ठक्कर यांनी स्पष्ट केले.

नाशिक
AIMA Index 2025 : तीन दिवसांत 50 हजार व्यक्तींची प्रदर्शनाला भेट

भव्य डोम आणि प्रशस्त स्टॉल्स

सहसमन्वयक उदय शाह, मार्जियान पटेल आणि अभय नेरकर यांनी सांगितले की, या एक्स्पोसाठी पाच भव्य डोम तयार करण्यात आले असून, प्रत्येक बिल्डर व डेव्हलपरसाठी ८ बाय ८ मीटर असे प्रशस्त आणि आकर्षक स्टॉल्स उपलब्ध करून दिले आहेत. यामुळे प्रत्येक सहभागीकडे आपले प्रकल्प उत्तमरित्या सादर करण्यासाठी पुरेसे स्थान असेल. नाशिकमधील नामांकित बिल्डर्स व कंपन्यांनी या एक्स्पोमध्ये सहभाग निश्चित केला असून, नवी लॉन्चिंग्ज, प्री-लाँच ऑफर्स आणि आकर्षक सवलती हे प्रदर्शनाचे मुख्य आकर्षण ठरणार आहेत.

ग्राहकांना चांदीचे नाणे भेट

होमेथॉन प्रॉपर्टी एक्स्पो या प्रदर्शनात घर बुक करणाऱ्या ग्राहकांना चांदीचे नाणे भेट देणार असल्याचे आयोजकांतर्फे सांगण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news