Homethon Property Expo 2025 | ‘होमेथॉन प्रॉपर्टी एक्स्पो’त 100 कोटींची उलाढाल

नरेडको आयोजित प्रदर्शनाचा आज समारोप, हरित नाशिक, घरखरेदी, विश्वासाचा यशस्वी संगम
Homethon Property Expo 2025
Homethon Property Expo 2025 नाशिक: नरेडको आयोजित ‘होमेथॉन प्रॉपर्टी एक्स्पो २०२५’ प्रदर्शनाला नाशिककरांची झालेली गर्दीPudhari News Network
Published on
Updated on

नाशिक: नरेडको आयोजित ‘होमेथॉन प्रॉपर्टी एक्स्पो २०२५’ प्रदर्शनात तीन दिवसांत १०० कोटी रुपयांहून अधिक उलाढाल झाल्याची माहिती मुख्य समन्वयक जयेश ठक्कर सचिव शंतनु देशपांडे यांनी दिली. प्रदर्शनाला कझागीस्तानचे राजदूत स्वप्नील कोठावदे यांनीही भेट देत नरेडकोच्या उपक्रमाचे कौतुक केले आणि पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या.

एक्स्पोचा रविवार (दि.21) रोजी आज सायंकाळी उत्साहपूर्ण वातावरणात समारोप होत आहे. गेल्या तीन दिवसांत नाशिककरांनी या भव्य गृहप्रदर्शनाला दिलेला प्रतिसाद पाहता हा एक्स्पो केवळ घरखरेदीचा मंच न राहता नाशिकच्या शाश्वत विकासाचा, पर्यावरण संवर्धनाचा आणि नागरिकांच्या विश्वासाचा एक महत्त्वाचा टप्पा ठरल्याचे स्पष्ट झाले आहे.

डोंगरे वसतिगृह मैदानावर आयोजित या प्रदर्शनात घरखरेदी, गुंतवणूक, आधुनिक जीवनशैली आणि पर्यावरणपूरक विकास यांचा सुरेख संगम अनुभवायला मिळाला. फ्लॅट्स, प्लॉट्स, कमर्शियल प्रॉपर्टी, गृहकर्ज, इंटिरियर डिझाइन, स्मार्ट होम सोल्यूशन्स आणि व्हर्च्युअल रिॲलिटी यांसारख्या सुविधा एकाच छताखाली उपलब्ध करून देत नरेडकोने नागरिकांसाठी घरखरेदीची निर्णयप्रक्रिया अधिक सुलभ आणि पारदर्शक केली.

Homethon Property Expo 2025
Homethon Property Expo 2025 | 'होमेथॉन' ला यंदा विक्रमी संख्येने नागरिक देणार भेट

प्रदर्शनात तीन दिवसांत सुमारे ३० हजारांहून अधिक नागरिकांनी प्रदर्शनाला भेट दिली, तर २०३ जणांनी प्रत्यक्ष बुकिंग करत घरखरेदी निश्चित केली. प्रत्येक बुकिंग करणाऱ्या ग्राहकाला नरेडकोच्या वतीने १० ग्रॅम चांदीचे नाणे भेट म्हणून देण्यात आले. प्रदर्शनाला भेट देणाऱ्या अनेक नागरिकांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले की, नरेडकोच्या माध्यमातून नाशिकमधील विविध गृहप्रकल्पांची माहिती एकाच ठिकाणी मिळाली आहे. त्यामुळे तुलना करणे सोपे जाते आणि घरखरेदीसाठीचा आत्मविश्वास वाढतो. आज नाशिक वेगाने विकसित होत असून देशपातळीवर नाशिककडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलत आहे. नागरिकांच्या या प्रतिक्रियांमधून प्रदर्शनाचे सामाजिक आणि आर्थिक महत्त्व अधोरेखित झाले.

नाशिक आदर्श शहर

नाशिक शहराचे वैशिष्ट्य म्हणजे येथील आल्हाददायक हवामान, धार्मिक आणि सांस्कृतिक वातावरण, शिक्षण व आरोग्य सुविधा, रोजगाराच्या संधी आणि शांत जीवनशैली आहे. यामुळे नाशिक हे निवृत्तीनंतर वास्तव्यासाठीही आदर्श शहर म्हणून ओळखले जात आहे. “पूर्वीचे नाशिक आणि आजचे नाशिक यामध्ये मोठा बदल झाला असून या परिवर्तनाचे श्रेय येथील बिल्डर आणि विकासकांना जाते, अशी भावना अनेक नागरिकांनी व्यक्त केली.

Homethon Property Expo 2025
Nashik Homethon : ‘होमेथॉन’मधून पर्यावरणपूरक विकासाचा संदेश

लागवड करण्याचा उपक्रम

सामाजिक बांधिलकी जपत नरेडकोच्या माध्यमातून काही समाजसेवी संस्थांना मोफत स्टॉल उपलब्ध करून देण्यात आले. त्याचबरोबर ‘हरित नाशिक’ या संकल्पनेला चालना देण्यासाठी प्रदर्शनाला येणाऱ्या नागरिकांच्या संख्येइतकी वृक्षलागवड करण्याचा उपक्रम राबविण्यात आला. पर्यावरणपूरक विकासाच्या या उपक्रमाचे नागरिकांनी विशेष कौतुक केले.

पार्किंगसाठी मदत करणार: ठक्कर

आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नरेडकोकडून करण्यात येणाऱ्या सहकार्याबाबत माहिती देताना नरेडकोचे मुख्य समन्वयक जयेश ठक्कर म्हणाले की, कुंभमेळ्याच्या काळात बिल्डरांकडे उपलब्ध असलेले फ्लॅट्स भाविकांसाठी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जाईल. तसेच मोक्याच्या ठिकाणी असलेल्या मोकळ्या जागा शाही स्नानाच्या वेळी पार्किंगसाठी देण्यात येतील.”

होमेथॉन २०२५ च्या शेवटच्या दिवशी नाशिकच्या विकासावर विशेष चर्चासत्र आयोजित करण्यात आले आहे. या चर्चासत्रात आमदार देवयानी फरांदे, सीमा हिरे आणि राहुल ढिकले यांच्यासह नरेडकोचे पदाधिकारी शहराच्या भविष्यातील विकासदृष्टीवर चर्चा करणार आहेत.

प्रदर्शनाला मिळालेल्या मोठ्या प्रतिसादामुळे बांधकाम व्यावसायिक आणि स्टॉलधारकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. पहिल्या तीन दिवसांतच मोठ्या प्रमाणावर सदनिका, शॉप्स आणि प्लॉट्सचे स्पॉट बुकिंग झाले असून, लॉन्ग वीकेंडचा लाभ घेत अनेक साईट व्हिजिट्सचेही नियोजन करण्यात आले आहे.

प्रदर्शनातील काही वैशिष्ट्यपूर्ण प्रकल्पांनी ग्राहकांचे विशेष लक्ष वेधून घेतले. १२.५२ कोटी रुपयांची किंमत असलेला सर्व सुखसुविधांनी युक्त आलिशान फ्लॅट, तसेच मुंबईप्रमाणे नाशिकमध्ये ४५ मजल्यांपर्यंत बांधकाम असलेल्या गोविंदनगर, गंगापूर रोड, नवश्या गणपती, सोमेश्वर परिसरातील इमारती ग्राहकांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरल्या. याशिवाय काही बांधकाम व्यावसायिकांनी नाशिकबरोबरच इतर शहरांतील त्यांच्या प्रोजेक्ट्सची माहिती उपलब्ध करुन दिली.

Nashik Latest News

विविध नामांकित स्पॉन्सर्सच्या सहकार्यामुळे हे प्रदर्शन अधिक भव्य झाले. दीपक बिल्डर अँड डेव्हलपर्स टायटल स्पॉन्सर म्हणून सहभागी झाले, तर एबीएच डेव्हलपर्स आणि ललित रूंगटा ग्रुप को-पॉवर्ड बाय म्हणून जोडले गेले. जॅक्वार अँड सिरॅमिक ट्रेडर्स, द व्हीआर कंपनी आणि बीएसएनएल यांचाही मोलाचा सहभाग लाभला.

प्रदर्शन यशस्वी करण्यासाठी नरेडकोची मोठी टीम अथक परिश्रम घेत आहे. मुख्य समन्वयक जयेश ठक्कर, सहसमन्वयक उदय शाह, मार्जियान पटेल, अभय नेरकर,मा. चेअरमन अभय तातेड, अध्यक्ष सुनील गवादे, सचिव शंतनु देशपांडे, खजिनदार भूषण महाजन यांच्यासह भाविक ठक्कर, पुरुषोत्तम देशपांडे, प्रशांत पाटील, हर्षल धांडे, प्रसन्न सायखेकर, मुकुंद साबु, पंकज जाधव, ताराचंद गुप्ता, परेश शहा, राजेंद्र बागड, मयूर कपाटे, नितीन सोनावणे, शशांक देशपांडे आदी सदस्यांनी या आयोजनासाठी मोलाचे योगदान दिले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news