Hit and Run! मद्यधुंद समाजकल्याण अधीक्षकाने उडविल्या तीन गाड्या

हिट ॲण्ड रन : दुचाकीलाही धडक, चालकाला अटक
Hit and Run, Nashik
मद्यधुंद असलेल्या समाजकल्याण विभागाच्या अधीक्षकाने दोन चारचाकींसह दुचाकीला धडक दिली. pudhari news network
Published on
Updated on

नाशिक : मद्यधुंद असलेल्या समाजकल्याण विभागाच्या अधीक्षकाने दोन चारचाकींसह दुचाकीला धडक दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. घटनेनंतर अधीक्षकाने पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, नागरिकांच्या सर्तकतेमुळे त्याला पोलिसांच्या ताब्यात देणे शक्य झाले. सुदैवाने या घटनेत जीवितहानी झाली नाही.

गेल्या काही दिवसांपासून राज्यभरात हिट ॲण्ड रनच्या घटना उघडकीस येत आहेत. नाशिकमध्ये भद्रकाली पोलिस ठाणे हद्दीत अशा प्रकारची हिट ॲण्ड रनची घटना उघडकीस आली. समाजकल्याण विभागाचा अधीक्षक विजय चव्हाण हा इतका दारूच्या नशेत होता की, त्याला गाडी चालवणे अवघड झाले होते. त्याचा गाडीवरील ताबा सुटला अन् जो समोर येईल त्याला त्याने धडक दिली. यात सुदैवाने जीवितहानी झाली नसली, तरी संतप्त लोकांनी त्याला पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलिस निरीक्षक श्रीनिवास देशमुख म्हणाले, शुक्रवारी (दि. २३) रात्री १०.३० च्या सुमारास विजय चव्हाण (५६) मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवत होता. काठे गल्ली सिग्नलसमोरील पौर्णिमा बसस्टॉप परिसरातील गणपती स्टॉलजवळ येताच त्याचा गाडीवर ताबा सुटला. याठिकाणी उभ्या असलेल्या गाड्यांना त्याने जोरदार धडक दिली. तसेच दुचाकीलाही धडक दिली. यात सर्व गाड्यांचे मोठे नुकसान झाले. दरम्यान, विजय चव्हाणला ताब्यात घेतले असून, त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोमवारी (दि. २६) त्याला न्यायालयात हजर केले जाईल.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news