Simhastha Flag Hoisting | तीर्थराज कुशावर्तावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते फडकली धर्मपताका

Simhastha Flag Hoisting | मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते ध्वजारोहण ; राष्ट्रपतींकडून गोदावरी पूजन
Simhastha Flag Hoisting
Simhastha Flag Hoisting
Published on: 
Updated on: 

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
दक्षिणगंगा गोदावरीचे उगमस्थान आणि द्वादश ज्योतिर्लिंगांपैकी एक स्थान असलेल्या त्र्यंबकेश्वरनगरीत शनिवारी अलौकिक व दैवीपर्वाचा प्रारंभ झाला. कोट्यवधी सनातनी भाविकांच्या अगाध श्रद्धेचे परम केंद्र असलेल्या पवित्र कुशावर्त तीर्थावर वेदोक्त मंत्रोच्चार, कर्णकर्कश शंखध्वनी आणि अथंग भक्तीच्या वातावरणात सिंहस्थ कुंभमेळ्याचा 'धर्मध्वज' गगनभरारी घेतला.

Simhastha Flag Hoisting
President Droupadi Murmu | सायरनचा गजर आणि व्हीव्हीआयपी ताफ्यांमुळे नाशिक कुंभनगरीला आले हायप्रोफाइल छावणीचे स्वरूप

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आणि दक्षिणानाम्ना शृंगेरीपीठाचे जगद्गुरु शंकराचार्य स्वामी विधुशेखर भारती महास्वामीजी यांच्या सानिध्यात हा मंगलसोहळा झाला. कुशावर्तावर धर्मध्वज फडकताच त्र्यंबकनगरी 'हर हर महादेव' आणि 'जय गंगे'च्या जयघोषाने दुमदुमली अन् सिंहस्थ महाकुंभाच्या शंखनाद झाला.


शनिवारी (दि. ३१) सकाळपासूनच कुशावर्त परिसरात मंगळमय स्वरूप प्राप्त झाले होते. विविध आखाड्यांचे तपस्वी साधु-संत, आचार्य, वैदिक पुरोहितांचे यांची मांदियाळी, आकर्षक पुष्पसजावट, आसमानत ढोलगाण्याचा मलयला पताका आणि धूप-दीपांच्या सुवासाने अवघा तीर्थरिसर पावन झाला होता.

मुख्यमंत्री फडणवीस यांचे आगमन होतच उपस्थित संत-महंतांच्या चरणी वंदन करून त्यांचे स्वागत करण्यात आले. शृंगेरी पीठाधीश्वर जगद्गुरु शंकराचार्य यांच्या प्रमुख उपस्थितीने या विधीला अद्वितीय आध्यात्मिक अधिष्ठान लाभले. कुशावर्ताच्या पवित्र जलाचे अर्घ्य, मंत्रोच्चार आणि वैदिक रीतीनुसार विहित पूजन करण्यात आले.

आराध्यदैत्य गणपती बाप्पांचे ध्यान, कुलदेवता व इष्टदेवतेचे आवाहन आणि पावन गोदावरीची प्रार्थना करून आगामी सिंहस्थ कुंभमेर्ष निमित्त, मंगलमय व विश्वकल्याणकारी ठरावे, असा सामूहिक वैदिक संकल्प सोडण्यात आला.

शंखनाद, घंटािनाद अन् जयघोष

संकल्पपुजनानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते मुख्य ध्वजस्तंभाचे शास्त्रोक्त पूजन करण्यात आले. जगद्गुरु शंकराचार्य विधुशेखर भारती यांच्या पावन हस्ते धर्मध्वज आणि ध्वजपताकांचे पूजन झाले. मान्यवरांनी धर्मध्वजाची करून प्रदक्षिणा घालात देवाधिदेव भगवान त्र्यंबकेश्वराचे भावपूर्ण स्मरण केले.

वैदिक ब्राह्मणांच्या उच्चारित ऋचा, एकाच वेळी उमटलेले शंखध्वनी आणि घंटािनादाच्या मंगलमय लहरिमध्ये मुख्यमंत्र्यांनी धर्मध्वज उंचवला. गगनात भगवी पताका फडकताच अवघे वातावरण आध्यात्मिक रोमाच आणि सात्त्विक ऊर्जेने भरून गेले.

महाआरतीने सोहळ्याची सांगता

कुशावर्तावर गोदामातेची महाआरती करण्यात आली. कापूर आणि दीपज्योतीच्या लखलखाटात संपन्न झालेल्या या पूजेने सोहळ्याची सांगता झाली. या अद्वितीय सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी आ. हिरामण खोसकर, नगराध्यक्ष त्रिवेणी तुंगार, विशेष पोलिस महानिशीक्षक संजय ऐनापुरे, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद,

कार्यकारी अधिकारी ओमकार पवार, पोलिस अधीक्षक डॉ. डी. एस. स्वामी, उपविभागीय अधिकारी पकनदत्ता, तहसीलदार गणेश जाधव, मुख्याधिकारी गोविंद जाधव, अमोल चौधरी यांच्यासह विविध आखाड्याचे महामंडलेश्वर, महंत, स्थानिक जनप्रतिनिधी, प्रशासनिक अधिकारी आणि भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

राष्ट्रपतींकडून गोदावरी पूजन

गोदावरीच्या पुण्यमयी उगमस्थानी, अलौकिक कुशावर्त तीर्थाच्या साक्षिने आणि धनगंभीर वैदिक मंत्रोच्चारांच्या पावन स्वरांत सिंहस्थ कुंभमेळ्याचा आध्यात्मिक वैभववाला एक सुवर्णसृोळाची प्राप्त झाली. महामहीम राष्ट्रपति द्रौपदी मुर्मू यांच्या करकमलांतून कुशावर्ताच्या पवित्र उदकात आदिशक्ती गोदामातेचे षोडषोपचार पूजन झाले.

धर्मध्वजाचे विहित पूजन, गोदामाईला कुशावर्तापूर्वक अर्ध्यप्रदान आणि दीपमाळांच्या लखलखाटात झालेली गोदावरी आरती यामुळे त्र्यंबकनगरी भक्तीच्या अर्धांग डोहात न्हाऊन निघाली. राष्ट्रपतींचे कुशावर्त तीर्थावर आगमन होताच शंखध्वनी आणि वेदमंत्रांच्या जयघोषात धार्मिक विधींना प्रारंभ झाला.

विधीवेत्ता पुरोहितांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रपती मुर्मू यांनी आदिशक्ती गोदामातेचे मनोभाव पूजन करत आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पर्वारंभ करत त्यांनी राष्ट्रपत्नीथार्य अर्पण करत त्यांनी राष्ट्रपत्नीथार्य मंगलज्योतिर्लिंगाच्या प्रकाशात आणि घंटािनादाच्या गजरात राष्ट्रपतींनी गोदावरीची आरती ओवाळली.
या सोहळ्यास राज्यपाल जिष्णू देव वर्मा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, पालकमंत्री गिरीश महाजन, शिक्षणमंत्री दादा भुसे, रोहियो व राजशिष्टाचारमंत्री जयकुमार रावल, मंत्री नरहरी झिरवाल यांसह आमदार गोकुळ गितें, आमदार ॲड. माणिकराव कोकाटे, आमदार दिलीप बनकर, आमदार हिरामण खोसकर, नगराध्यक्षा त्रिवेणी तुंगार, विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेदाम, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार उपस्थित होते.

राष्ट्रपतींना ताम्रपट प्रदान

पुरोहित संघातर्फे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना कृतज्ञतेचे प्रतीक म्हणून सन्मानपूर्वक ताम्रपट प्रदान करण्यात आला. पुरोहित संघाचे अध्यक्ष मनोज थेते, जुना आखाड्याचे संरक्षक श्री हरिगिरीजी महाराज, विविध आखाड्यांचे साधु-संत, महंत आणि भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Simhastha Flag Hoisting
Nashik Municipal Corporation | नाशिक महापालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागासाठी तब्बल 1618 वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या भरतीला मिळणार मुहूर्त

नवीन कुशावर्तावरही ध्वजारोहण

सिंहस्थ कुंभमेळ्यानिमित्त पेगलवाडी येथे प्रयागतीर्थाजवळ ४.२ किलोमिटरने नवीन घाट निर्माण करण्यात आले आहेत. या ठिकाणी विधिवत पूजन करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. भाविकांना गोदावरी तीर्थात स्नान करणे नवीन कुशावर्त या नावानेदेखील या घाटांची ओळख निर्माण होईल, असा विश्वास मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला.

राष्ट्रपतींनी घेतले त्र्यंबकराज्याचे दर्शन

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर मंदिरात विधिवत पूजा करत दर्शन घेतले. यावेळी राज्यपाल डॉ. जिष्णू देव वर्मा, मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुप्रिया पवार, पणन व राजशिष्टाचारमंत्री जयकुमार रावल उपस्थित होते. यावेळी पुरोहित गिरीश जोशी यांनी पुरोहितांचे केले. दर्शननंतर मंदिर संस्थानतर्फे महोदयांना मंदिराची प्रतिकृती भेट देण्यात आली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.