लासलगाव : लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपबाजार असलेल्या खाणगाव येथे 2002 ला सुरू केलेल्या उपबजारात हिरवी मिरचीची विक्रमी आवक होत असून आहे. त्यामुले खानगाव हिरवी मिरची विक्रीचे मोठे केंद्र बनत आहे.
यापूर्वी खानगाव बाजारात सुमारे बारावर्षे द्राक्ष मणी लिलाव सुरू करण्यात आले होते. मात्र, 2020 पासून येथे भाजीपाला लिलावाला सुरुवात होऊन प्रामुख्याने हिरवी मिरची विक्री सुरू झाली. याचा लाभ परिसरातील शेतकऱ्यांना चांगलाच होत आहे. 2020 -21 ला हिरव्या मिरचीची आवक 39 हजार 623 क्विंटल होऊन त्या माध्यमातून 10 कोटी ५२ लाख रुपयांची उलाढाल झाली होती. 2023- 24 मध्ये 53,131 क्विंटल आवक होऊन १४ कोटी रुपयांची उलाढाल झाली होती. तर दोन वर्षाच्या तुलनेत यंदा उलाढाल साडेतीन कोटी रुपयांनी वाढली आहे. चालू हंगामात मे ते जुलै 2024 मध्ये हिरव्या मिरचीला सरासरी भाव 3800 रुपये क्विंटल मिळाला तर 22 ऑगस्ट 2024 ला 23 हजार बॅगची विक्रमी आवक झाली. 10 सप्टेंबर 2024 ला या मोसमात हिरव्या मिरचीला 5100 क्विंटल सर्वात जास्त दर मिळाला आहे. या बाजारात प्रामुख्याने निफाड व चांदवड तालुक्यातून मोठ्या प्रमाणात मिरची विक्रीस येत असल्याची माहिती येथील व्यापारी विजय घोरपडे, गणेश देशमुख यांनी दिली.