Pakistan Shehzad Bhatti Connection | "हिंदुत्ववादी कार्यकर्ते सागर बेग पाकच्या निशाण्यावर! घर बॉम्बने उडवून देण्याची धमकी"

Pakistan Shehzad Bhatti Connection | अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर येथील हिंदुत्ववादी कार्यकर्ते सागर बेग यांना थेट पाकिस्तानातून जीवे मारण्याची धमकी आल्याने राज्याच्या सुरक्षा यंत्रणांची झोप उडाली आहे.
Pakistan Shehzad Bhatti Connection
Pakistan Shehzad Bhatti Connection
Published on
Updated on

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर येथील हिंदुत्ववादी कार्यकर्ते सागर बेग यांना थेट पाकिस्तानातून जीवे मारण्याची धमकी आल्याने राज्याच्या सुरक्षा यंत्रणांची झोप उडाली आहे. सागर बेग आणि त्यांचे बंधू तथा शिवसेना नगरसेवक आकाश बेग यांचे घर बॉम्बने उडवून देण्याची धमकी पाकिस्तानस्थित कथित गुन्हेगारी टोळीकडून देण्यात आल्याचा आरोप करण्यात येत आहे.

Pakistan Shehzad Bhatti Connection
Ratnagiri News : चिपळूणमध्ये एटीएसची मध्यरात्री धाड

बेग यांना धमकीमागे पाकिस्तानातून कार्यरत असल्याचे सांगितले जाणारे वादग्रस्त व्यक्तिमत्त्व शहजाद भट्टी याचे कथित कनेक्शन असल्याची चर्चा तपासाच्या केंद्रस्थानी आली आहे. सोशल मीडियावरील काही व्हिडिओ, डिजिटल संदेश आणि संशयास्पद ऑनलाईन हालचालींच्या आधारे एटीएस विविध तांत्रिक पुराव्यांची पडताळणी करत आहे. मात्र, शहजाद भट्टीचा या प्रकरणाशी थेट संबंध असल्याबाबत तपास यंत्रणांनी अद्याप अधिकृत दुजोरा दिलेला नाही.

सागर बेग हे विविध हिंदुत्ववादी आंदोलनांमध्ये सक्रिय सहभागी असतात. त्यांचे बंधू आकाश बेग हे शिवसेनेचे नगरसेवक आहेत. शहजाद भट्टी हा पाकिस्तानातून सोशल मीडियावर सक्रिय असलेला वादग्रस्त व्यक्ती म्हणून ओळखला जातो. भारताशी संबंधित विषयांवर त्याने अनेकदा प्रक्षोभक विधाने केल्याची चर्चा यापूर्वीही झाली आहे.

त्यामुळे त्याचे नाव समोर आल्यानंतर तपास यंत्रणांनी डिजिटल पुराव्यांच्या आधारे त्याच्या कथित भूमिकेची सखोल छाननी सुरू केली आहे. धमकीनंतर श्रीरामपूरमध्ये सुरक्षाव्यवस्था वाढविण्यात आली आहे. मुंबई एटीएसचे विशेष पथक श्रीरामपूरमध्ये दाखल होऊन परदेशातून आलेले संदेश, सोशल मीडिया व्यवहार, डिजिटल संपर्क आणि इतर सर्व संशयित दुव्यांचा तपास करत आहे.

Pakistan Shehzad Bhatti Connection
Gangster Shahzad Bhatti | पाकिस्तानी गँगस्टर भट्टीच्या नेटवर्कला दणका

महाराष्ट्र एटीएसकडून तपास

भट्टी हा पाक सोशल मीडियावर सक्रिय असलेला वादग्रस्त व्यक्ती म्हणून ओळखला जातो. भारताशी संबंधित प्रक्षोभक वक्तव्ये आणि वादग्रस्त मीडिया पोस्टमुळे त्याचे नाव यापूर्वीही चर्चेत आले आहे. सागर बेग यांना मिळालेल्या धमकीच्या तपासात त्याचे नाव समोर आल्याने महाराष्ट्र एटीएस त्याचा या प्रकरणाशी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष संबंध आहे का, याची डिजिटल पुरावे, ऑनलाईन संपर्क, इतर तांत्रिक माहितीच्या आधारे पडताळणी करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news