Bhagur Municipal Council | भगूर नगर परिषदेच्या सभेत करवाढीवरून जोरदार खडाजंगी; सत्ताधारी-विरोधक आमनेसामने!

Bhagur Municipal Council | नगर परिषदेच्या सभेत 13 विषयांवर चर्चा, टपऱ्यांचे करारनामे होणार रद्द
भगूर नगर परिषद,देवळाली, नाशिक / Bhagur Municipal Council, Devlali, Nashik
भगूर नगर परिषद,देवळाली, नाशिक / Bhagur Municipal Council, Devlali, NashikPudhari News Network
Published on
Updated on

देवळाली कॅम्प : पुढारी वृत्तसेवा
करवाढीच्या मुद्द्यावरून भगूर नगर परिषदेच्या सर्वसाधारण सभेत सत्ताधारी व विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी मंगळवारी (दि. २५) बघायला मिळाली. नगराध्यक्ष प्रेरणा बलकवडे यांच्या अध्यक्षतेखाली व मुख्याधिकारी डॉ. सचिन पटेल यांच्या उपस्थितीत झालेल्या या सभेत २०१४ चा कर प्रणालीचा मुद्दा गाजत असताना शहरातील टपऱ्यांचे करारनामे रद्द करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. तसेच सभेत १३ विषयांवर चर्चा झाली. त्यात नगर परिषद हद्दीत विविध ठिकाणी नवीन अंगणवाडी बांधकाम करणे तसेच १५ व्या वित्त आयोग अंतर्गत कामे हाती घेण्याच्या विषयाला सर्वानुमते मंजुरी मिळाली.

भगूर नगर परिषद,देवळाली, नाशिक / Bhagur Municipal Council, Devlali, Nashik
ICU NICU Safety Audit | अमरावती दुर्घटनेनंतर नाशिक प्रशासन ॲक्शन मोडमध्ये; सर्व रुग्णालयांना फायर अन् इलेक्ट्रिकल ऑडिटचे आदेश!

सन २०१४ साली झालेल्या सभेत वाढविलेल्या रहिवासी व वाणिज्य मालमत्ताकरांमधील पुनर्मूल्यांकनाबाबत सर्वांत जास्त चर्चा झाली. या विषयावर विरोधकांनी आक्षेप घेत कर कमी करण्याची मागणी केली. तसेच आरक्षण क्र. २१ प्ले ग्राउंड या जागेतील आरक्षणात फेरबदल करून ते रहिवास विभागात समाविष्ट करण्याच्या विषयावरही चर्चा झाली.


शहरातील मारवाडी गल्ली तसेच क्रांती चौक ते मुरलीधर मंदिर रस्ता विकसित करणे या कामांना मंजुरी दिली. बांधकाम विभागासाठी विविध वार्षिक निविदा करणे, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे नागरी लोककल्याण अभियान राबविणे, डॉ. आंबेडकर डेली मार्केट इमारतीमध्ये युनियन बँकेस जागा देणे, नगर परिषद मालकीच्या ठिकाणी व प्रमुख रस्त्यांवरील कोणत्याही टपऱ्यांचे करारनामे रद्द करून त्यांची डेली मार्केटमध्ये पावती करणे यासह जादा विषयांवर चर्चा झाली.

भगूर नगर परिषद,देवळाली, नाशिक / Bhagur Municipal Council, Devlali, Nashik
Nashik Simhastha Kumbh Mela | सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी नाशिक सज्ज; 30 हजारांहून अधिक पोलिसांच्या निवासाचे नियोजन पूर्ण

सभेला उपनगराध्यक्ष प्रसाद आडके, विरोधी पक्षनेते शंकर करंजकर, ज्येष्ठ नगरसेवक दीपक बलकवडे, काकासाहेब देशमुख, विशाल बलकवडे, सुदेश वालझाडे, सागर चंद्रमोरे, सुजाता शिरसाट, लता थापेकर, विद्या बलकवडे, जयश्री देशमुख, मनीषा कस्तुरे, कांता गायकवाड, सोनाली सोनवणे, अश्विनी भवर, कापसाबाई साळवे, सुचित्रा बुरके, अमोल इंदरखे, डॉ. मृत्युंजय कापसे, फरीद शेख सह अधिकारी गीतांजली मराठे, सिद्धेश मुळे, दिनेश कचवे, रोहित सुरसे, रोशन उगले आदींसह कर्मचारी उपस्थित होते.

"स्वीकृत नगरसेवक नेमताना शासनाने दिलेल्या नियमावलीनुसार या नगरसेवकांनी इतर नगरसेवकांना मार्गदर्शन करायचे असते. मात्र भगूरमध्ये विरोधी पक्षाचे स्वीकृत नगरसेवक फक्त गोंधळ घालण्याचे काम करतात, असा आरोप सत्ताधाऱ्यांनी केला. तसेच यापुढे असा गोंधळ असल्यास सभेच्या नियमाप्रमाणे कारवाई केली जाईल."

- प्रेरणा बलकवडे (नगराध्यक्ष, भगूर)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news