Health Department Navratrotsav 2026 | सप्तशृंगगडावरील नवरात्रोत्सवासाठी आरोग्य विभाग सज्ज; 42 अधिकारी व 80 कर्मचारी तैनात

Health Department Navratrotsav 2026 | 42 वैद्यकीय अधिकारी, 80 आरोग्य कर्मचारी तैनात
Doctor
DoctorPudhari
Published on: 
Updated on: 

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

शारदीय नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर श्री सप्तशृंगनिवासिनी देवी गडावर दर्शनासाठी येणाऱ्या लाखो भाविकांच्या आरोग्य रक्षणासाठी नाशिक जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने व्यापक नियोजन केले आहे. यात्रेदरम्यान भाविकांना तातडीने वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्यासाठी ४२ वैद्यकीय अधिकारी, ८० आरोग्य कर्मचारी, सहा फिरती आरोग्य पथके आणि सहा रुग्णवाहिकांची व्यवस्था केली आहे.

Doctor
Dwarka Datta Mandir Road | द्वारका ते दत्तमंदिर रस्ता रुंदीकरणाचा मार्ग अखेर मोकळा; नाशिक महापालिकेची 84 कोटींची मोठी बचत

पिण्याच्या पाण्याची गुणवत्ता, स्वच्छता, साथरोग प्रतिबंध आणि आपत्कालीन वैद्यकीय सेवांवर विशेष भर दिला आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार यांच्या સૂचनेनुसार आणि जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजेंद्र बागुळ यांच्या मार्गदर्शनाखाली हे नियोजन केले आहे.

गडावरील ओपीडी, ट्रस्ट दवाखाना, श्रीराम मंदिर परिसर, छत्री पॉइंट, पाणी शुद्धीकरण केंद्र, आरोग्य उपकेंद्र आणि फ्युनिक्युलर ट्रॉली परिसर येथे आवश्यक आरोग्य सुविधा उपलब्ध करून देणार आहेत. चक्कर येणे, अशक्तपणा, निर्जलीकरण, उलटी, जुलाब, ताप आणि किरकोळ दुखापतींसाठी तातडीने उपचार देण्याची व्यवस्था केली आहे.

तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अभय बंगाळ यांची यात्राप्रमुख म्हणून, तर प्राथमिक आरोग्य केंद्र, नांदुरीचे वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रवीण बैरागी यांची समन्वयाची जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे. ग्रामपंचायत, देवी ट्रस्ट, पोलिस आणि संबंधित यंत्रणांनी समन्वयाने काम करावे, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.

— डॉ. अभय बंगाळ, यात्राप्रमुख

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news