नाशिक : राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षणमंत्री छगन भुजबळ यांचा मंगळवारी (दि.१५) ७७ वा वाढदिवस साजरा होत आहे. या निमित्ताने नाशिक येथील कार्यालयात अभीष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
मंत्री छगन भुजबळ हे सकाळी १० ते दुपारी १ पर्यंत शुभेच्छा स्वीकारण्यासाठी भुजबळ फार्म कार्यालय नाशिक येथे उपस्थित असणार आहे. यावेळी पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी शाल, बुके, हार व इतर वस्तू न आणता शुभेच्छा म्हणून केवळ वह्या किंवा पुस्तके आणावेत. या वह्या गोरगरीब विद्यार्थ्यांना वाटप करण्यात येणार आहे. त्यामुळे शाल, बुके, हार न आणता वह्या किंवा पुस्तके आणाव्यात, अशी सूचना मंत्री भुजबळ यांनी केली आहे.