GST Impact on Diwali 2025 : 'जीएसटी'ची कमाल; वाहन उद्योगात धमाल

दिवाळीच्या मुहूर्तावर ३,६७९ वाहनांची नाशिककरांकडून खरेदी
GST Impact on Diwali 2025 : 'जीएसटी'ची कमाल; वाहन उद्योगात धमाल
Published on
Updated on

नाशिक : सतिश डोंगरे

ऐन दसरा, दिवाळीच्या मुहूर्तांवर केंद्र सरकारने जीएसटी दरांच्या स्लॅबमध्ये कपात केल्याने, वाहन उद्योगाला मोठा लाभ झाला. ग्राहकांनी जीएसटी दर कपातीचा पुरेपुर लाभ घेत मोठ्या प्रमाणात वाहने खरेदी केल्याने, वाहन उद्योगाच्या अर्थचक्राला मोठी गती मिळाली आहे. नाशिककरांनी दिपोत्सवाच्या मुहूर्तावर अवघ्या आठच दिवसात तब्बल तीन हजार ६७९ वाहनांची खरेदी केली आहे.

शासनाने वाहनांवर २८ ऐवजी १८ टक्के जीएसटी आकारल्याने, ५० हजारांपासून ते २५० लाखांपर्यंत बचत करणे शक्य झाल्याने, नाशिककरांनी गतवर्षीच्या तुलनेत यंदा वाहन खरेदीचा नवा उच्चांक प्राप्त केला आहे. २०२४ मध्ये दिवाळीत नाशिककरांनी तीन हजार ५९७ वाहने खरेदी केली होती. यंदा त्यात ८२ वाहनांची अधिकची भर पडली आहे. यंदा धनत्रयोदशी, लक्ष्मीपूजन, पाडवा, भाऊबीज या प्रत्येक मुहूर्तावर नाशिककरांनी वाहन खरेदीचा मुहूर्त साधला. दुचाकी आणि चारचाकीमध्ये विक्रमी उलाढाल झाल्याने, वाहन उद्योगाला मोठे बळ मिळाले आहे. गतवर्षी बस, डंपरची विक्री झाली नव्हती. यंदा नाशिककरांनी बस, डंपर खरेदीचाही मुहूर्त साधला. यंदा नाशिक जिल्ह्याला अतिवृष्टीचा फटका बसल्याने, बळीराजा संकटात सापडला आहे. मात्र, अशातही ग्रामीण भागात गतवर्षीच्या तुलनेत यंदा ट्रॅक्टर विक्री जोरात झाली. गेल्यावर्षी ९१ ट्रॅक्टरची विक्री झाली होती. यंदा त्यात मोठी भर पडली असून, १३१ पर्यंत संख्या पोहोचली आहे.

GST Impact on Diwali 2025 : 'जीएसटी'ची कमाल; वाहन उद्योगात धमाल
Diwali 2025 : नाशिककरांचा पाच हजार कोटींच्या खरेदीचा बार

दरम्यान, प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे पुढील काही दिवसात आणखी नव्या वाहनांची नोंद होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळे हा आकडा चार हजारांपर्यंत जाईल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. तसेच अतिवृष्टीचा फटका बसला असतानाही, केवळ जीएसटीत केलेल्या कपातीमुळेच वाहन उद्योगात मोठी उलाढाल झाली असल्याचेही बोलले जात आहे.

१७ ते २४ ऑक्टोंबरमध्ये अशी झाली वाहन विक्री

  • चारचाकी - १,०५१

  • दुचाकी - २,१४५

  • मोपेड - १२२

  • ट्रॅक्टर - १३१

  • रिक्षा (प्रवासी) - ५४

  • रिक्षा (मालवाहू) - १४

  • मालगाडी - ९६

  • बस - २१

  • डंपर - ०५

  • एकुण ३,६७९

आणखी आकडा वाढणार

दिवाळी संपली असली तरी, वाहन बाजारात ग्राहकांची वर्दळ कायम आहे. अनेकांनी दिवाळीच्या मुहूर्तावर वाहने बुकींग केली आहेत. मात्र, काही कारणांनी कंपन्यांकडून त्यांना अद्याप डिलिव्हरी दिली नाही. वाहनांचा रंग, मॉडेल उपलब्ध नसल्याने, डिलिव्हरी रखडल्या आहेत. पुढील आठवडाभरात या डिलिव्हरी दिल्या जाण्याची शक्यता असल्याने, वाहन संख्येचा आकडा वाढणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news