Father Daughter Suicide | सिडकोत आणेराव कुटुंबावर दोन आत्महत्यांमुळे दुःखाचा डोंगर

Father Daughter Suicide | कन्येच्या आत्महत्येने वडिलांनीही संपवले जीवन
Death
DeathPudhari
Published on
Updated on

सिडको : पुढारी वृत्तसेवा

कामटवाडे परिसरात रविवारी (दि. २६) रात्री नववीतील मुलीने केलेल्या आत्महत्येनंतर आपल्या लाडक्या कन्येचा विरह सहन न झाल्याने बुधवारी (दि. २८) वडिलांनीही आत्महत्या केल्याने संपूर्ण नाशिक शहर हादरले. विशेष म्हणजे मुलीने आत्महत्येपूर्वी 'आय लव्ह यू पप्पा' असे चित्र आपल्या चित्रकला वहीत काढून वडिलांप्रति असलेले आपले प्रेम व्यक्त करत जगाचा निरोप घेतला. या प्रसंगाचा खोल परिणाम झाल्यानेच तिच्या वडिलांनी मृत्यूला कवटाळले, अशी चर्चा सुरू आहे.

Death
Ozar Flyover Repair | "ओझरला उड्डाणपूल दुरुस्ती, सात दिवस नाशिक लेन बंद! धोकादायक भगदाडामुळे एकेरी वाहतूक व्यवस्था"

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २६ जुलैला रात्री प्रणवी आणेराव (१४) हिने राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली होती. तिने आपल्या घरात वरच्या मजल्यावरील खोलीत गळफास घेतला होता. आत्महत्या करण्यापूर्वी तिने आपल्या चित्रकला वहीत 'आय लव्ह यू पप्पा' असे सुंदर चित्र काढले होते.

रात्री वरच्या रूममध्ये झोपण्यास जाण्यापूर्वी तिने ते आपल्या वडिलांना दाखवले होते. त्यानंतर तिने रविवारी रात्री आत्महत्या केली. या घटनेतून आणेराव कुटुंब सावरत असतानाच २८ जुलैला तिचे वडील हर्षल आणेराव (४५) यांनीही आपल्या लाडक्या कन्येने ज्या खोलीत गळफास घेतला, तिथेच आत्महत्या करत मृत्यूला कवटाळले. बुधवारी सकाळी हा प्रकार लक्षात आल्यानंतर सिडको परिसरात एकच खळबळ उडाली.

पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आणेराव यांचा मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठवला. पोलिसांच्या माहितीनुसार, हर्षल आणेराव यांचा दुसरा विवाह झाला होता. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, मुलगा आणि आत्महत्या केलेली प्रणवी असा परिवार होता. प्रणवीच्या आत्महत्येचा तपास सुरू असताना हर्षल आणेराव यांनी आत्महत्या केल्याने पोलीस या प्रकाराने चक्रावून गेले आहे.

Death
Nashik Rain Yellow Alert Update | "संततधार सुरूच; उद्या नाशिक जिल्ह्यासाठी पुन्हा 'यलो अलर्ट' जारी"

पोलिसांनी शेजाऱ्यांकडून या कुटुंबाबाबत माहिती संकलित करण्यास सुरुवात केली आहे. आत्महत्येमागील नेमके कारण तपासातूनच स्पष्ट होणार आहे.

मुलीच्या 'त्या' चित्राची चर्चा

वडिलांवर असलेले आपले प्रेम व्यक्त करण्यासाठी प्रणवीने काढलेल्या 'आय लव्ह यू पप्पा' या चित्राची साऱ्या नाशिकमध्ये चर्चा होत आहे. आपल्या वडिलांवर असलेले प्रेम व्यक्त करणाऱ्या या मुलीने इतके टोकाचे पाऊल का उचलले, अशी खंत नाशिककर व्यक्त करताना दिसत आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास आता मानसशास्त्रीय पातळीवरही करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news