Gondeshwar Temple Sinnar| गोंदेश्वर मंदिर बांधणाऱ्या गोविंदराजाचे शिल्प प्रथमच प्रकाशझोतात

Gondeshwar Temple Sinnar| प्रा. शेख यांचा महत्त्वपूर्ण शोध; प्राचीन ग्रंथांच्या आधारे दानकर्त्याची ओळख स्पष्ट
goa news
goa news
Published on
Updated on

सिन्नर : संदीप भोर

महाराष्ट्रातील सर्वात सुंदर शैवपंचायतन मंदिरांपैकी एक मानल्या जाणाऱ्या गोंदेश्वर मंदिर बांधणाऱ्या दानकर्त्याचे शिल्प प्रथमच प्रकाशझोतात आले आहे. इतिहास अभ्यासक तथा स्थापत्य संशोधक प्रा. जावेद शेख यांनी या शिल्पाची ओळख पटवत त्यामागील ऐतिहासिक संदर्भ मांडले आहेत. यापूर्वी त्यांनी त्रिंगलवाडी किल्ला परिसरातील नाशिक जिल्ह्यातील पहिली सतीशिळा उजेडात आणली होती.

goa news
Nashik Municipal Corporation | नाशिक मनपाच्या तिजोरीच्या चाव्या तरुण नेतृत्वाकडे; मच्छिंद्र सानप स्थायी समितीचे 39 वे सभापती!

गोंदेश्वर मंदिराच्या बांधकामासंदर्भात कोणताही शिलालेख अथवा ताम्रपट उपलब्ध नसल्याने इतिहासात स्पष्ट उल्लेख आढळत नाही. मात्र, सर्वज्ञ श्री चक्रधरस्वामी यांच्या लीळा क्रमांक २४५ मध्ये हा 'गोंदेश्वरू... हे मागा गोविंदे नामे वेव्हारा तेणे केले...' असा उल्लेख असून, मंदिर गोविंद नावाच्या व्यक्तीने बांधल्याचे नमूद आहे. गोविंदराजा नेमका कोण होता, याबाबत इतिहासकारांत मतभेद आहेत.

तो धनाढ्य व्यापारी होता की यादवकालीन राजघराण्याशी संबंधित होता, यावर संशोधन सुरू आहे. काही अभ्यासकांच्या मते यादव राजा मल्लुगी (पहिला) याचा पुत्र युवराज गोविंदराजा याने मंदिर उभारले असावे, अशी शक्यता व्यक्त केली जाते. प्रा. शेख यांनी मंदिराच्या पूर्वद्वारातून सभामंडपात प्रवेश केल्यानंतर उत्तर-पूर्व स्तंभावर पायथ्याशी कोष्टकात असलेली अंजली मुद्रेत उभी मानवी आकृती अभ्यासली.

goa news
Malegaon Municipal Corporation | महापालिका विद्युत विभागात नमाजपठण

दाढी, साधे वस्त्र, मोजके अलंकार, कानातील कुंडले आणि नम्र भाव अशी या शिल्पाची वैशिष्ट्ये आहेत. मानसार आणि शिल्पप्रकाश या प्राचीन शिल्पग्रंथांनुसार दानकर्त्याची मूर्ती अंजली मुद्रेत, देवमूर्तपिक्षा लहान आकारमानाची व स्तंभाच्या पायथ्याशी किंवा प्रवेशद्वाराजवळ असावी, असे निर्देश आहेत. गोंदेश्वर मंदिरातील शिल्प या सर्व निकषांना अनुरूप असल्याने ते मंदिर बांधणाऱ्या व धर्मदान करणाऱ्या गोविंदराजाचे असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला आहे. या शोधामुळे सिन्नरच्या ऐतिहासिक, धार्मिक आणि सांस्कृतिक वैभवात भर पडली असून, गोंदेश्वर मंदिराच्या स्थापत्य अभ्यासाला नवी गती मिळाली आहे.

66 शेख यांचे शिवचरित्र प्रकाशित झाले असून, त्रिंगलवाडी किल्ला व गोंदेश्वर मंदिरावर त्यांचे संशोधनकार्य सुरू आहे. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर गोंदेश्वर मंदिर दर्शन हे पुस्तक प्रकाशित होणार असून, त्यात मंदिराशी संबंधित अनेक ऐतिहासिक व स्थापत्यदृष्ट्या महत्त्वाच्या बाबींचा ऊहापोह करण्यात आला आहे.

प्रा. जावेद शेख, इतिहास अभ्यासक तथा स्थापत्य संशोधक

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news