

जळगाव : 'सोनं गेलं आकाशाला आणि चांदी गेली ढगाला' अशा स्थितीत ग्राहकांसाठी गुरुवार (दि. २२) दिलासा देणारा ठरला. सुवर्णनगरीच्या सराफा बाजारात सोन्या-चांदीच्या दरांनी मान टाकली. एकाच दिवसात २४ कॅरेट सोन्याचे दर ३,५०० रुपयांनी खाली आले, तर चांदीच्या भावात तब्बल १५,००० रुपयांची विक्रमी घसरण झाली.
लग्नसराईच्या तोंडावर भाव गडगडल्यामुळे ग्राहकांना काहीसा आधार मिळाला आहे. गेल्या काही दिवसांपासून तेजीच्या लाटेवर स्वार झालेल्या सोन्याला गुरुवारी ब्रेक लागला. बुधवारी (दि. २१) सोन्याचे भाव उच्चांकी पातळीवर होते, मात्र आंतरराष्ट्रीय घडामोडी आणि स्थानिक मागणीतील तफावत यामुळे गुरुवारी बाजार उघडताच दरात मोठी घसरण पाहायला मिळाली. २४ कॅरेट सोने ४५०० नी, तर चांदीचे दर तर ३ लाखांच्या घरातून थेट खाली आले.
२१ जानेवारी : १,५५,००० रुपये
२२ जानेवारी : १,५१,५०० रुपये
घसरण : ३,५०० रुपये
२१ जानेवारी : १,४१,९८० रुपये
२२ जानेवारी : १, ३८,७७४ रुपये
घसरण : ३,२०६ रुपये
२१ जानेवारी : ३,२३,००० रुपये
२२ जानेवारी : ३,०८,००० रुपये
घसरणः १५,००० रुपये