Gold Price Hike | सोने दरात पुन्हा उसळी

गुढीपाडव्याआधी ग्राहकांना धक्का
gold price Increase
gold price Increase Pudhari News Network
Published on
Updated on

नाशिक : गेल्या काही दिवसांपासून दरात तेजी नोंदविणाऱ्या सोने दरासाठी मागील आठवडा चढउताराचा राहिला. तीन दिवसांपूर्वी किंचित घट नोंदविणाऱ्या सोन्याने शुक्रवारी (दि. २८) पुन्हा एकदा उसळी घेतली आहे. त्यामुळे ऐन गुढीपाडव्याआधीच ग्राहकांना धक्का बसला आहे.

Summary

साेने दर (जीएसटीसह)

  • २४ कॅरेट - प्रतितोळा - ९१ हजार ५०० रुपये.

  • २२ कॅरेट - प्रतितोळा - ८४ हजार २०० रुपये.

  • चांदी - प्रतिकिलो - १ लाख ५ हजार

साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर सोने खरेदी शुभ मानली जाते. दरात जरी चढउतार असली तरी, मुहूर्तावर सोने खरेदी करणाऱ्या ग्राहकांचे प्रमाण कायम आहे. त्यातच आठवड्याच्या प्रारंभीच दरात घसरण नोंदविली गेल्याने, ग्राहकांमध्ये काही प्रमाणात उत्साहाचे वातावरण होते. सोमवारी (दि.२४) दरात १६० रुपयांची घसरण नोंदविली गेल्यानंतर, सलग दुसऱ्या दिवशी म्हणजेच मंगळवारी (दि.२५) ३३० रुपयांची सोने कमी झाले होते. त्यामुळे गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर दरात आणखी घसरण होईल, अशी अपेक्षा ग्राहकांकडून वर्तविली जात होती. परंतु आठवड्याच्या अखेरच्या तीन दिवसांत सोने तब्बल १६९० रुपयांनी वधारल्याने, ऐन गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर ग्राहकांना धक्का बसला आहे. शुक्रवारी (दि.२८) २४ कॅरेट, प्रतितोळा ९१ हजार ५०० रुपयांचा दर नोंदविला गेला आहे.

चांदीला पुन्हा चकाकी

चांदी दरातील तेजी कायम असून, अवघ्या दोनच दिवसांत चांदी चार हजार शंभर रुपयांनी वधारली आहे. गेल्या बुधवारी (दि.२६) चांदीचे दर एक लाख नऊशे रुपयांनी घसरले होते. मात्र, मागील दोन दिवसांत पुन्हा एकदा चांदी दराने उसळी घेतल्याने, चांदी थेट एक लाख पाच हजारांवर गेली आहे. चांदीत गुंतवणूक करणाऱ्यांचे प्रमाण वाढत आहे.

सोने आणि चांदीच्या दरात आठवड्यात बराच चढउतार बघावयास मिळाला. दर कमी होत असल्याने, उत्साहाचे वातावरण असतानाच पुन्हा एकदा दरांनी उसळी घेतली आहे. अशातही ग्राहकांचा प्रतिसाद चांगला असून, गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर ग्राहकांकडून जोरात खरेदी केली जाणार आहे.

गिरीश नवसे, अध्यक्ष, सराफ असोसिएशन, नाशिक.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news