Gold ETF : गोल्ड इटीएफ गुंतवणूक 90 हजार कोटी रुपयांवर

संपत्ती निर्मितीला गुंतवणूकदारांकडून सोनेरी मुलामा, सप्टेंबरमध्ये तब्बल 5300 कोटींची भर
नाशिक
गुंतवणूक करू इच्छिणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी गोल्ड एक्सचेंज ट्रेडेड फंड्स (इटीएफ) आणि गोल्ड इटीएफ फंड ऑफ फंड्स (एफओएफ) यासारखे सोने गुंतवणूकीचे आधुनिक प्रकार उत्तम पर्याय ठरले आहेत. Pudhari News Network
Published on
Updated on

नाशिक: सोन्यात किफायतशीर आणि तरल गुंतवणूक करू इच्छिणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी गोल्ड एक्सचेंज ट्रेडेड फंड्स (इटीएफ) आणि गोल्ड इटीएफ फंड ऑफ फंड्स (एफओएफ) यासारखे सोने गुंतवणूकीचे आधुनिक प्रकार उत्तम पर्याय ठरले आहेत. गोल्ड इटीएफमधील गुंतवणूक सप्टेंबर २०२५ अखेरीस ९० हजार कोटी रुपयांवर पोहचल्याचे ॲम्फीच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे. डिसेंबरपर्यंत ही गुंतवणूक एक लाख कोटी रुपयांवर पोहचण्याचा अंदाज आहे.

शेअरबाजारातील सध्याची अस्थिरता पाहता गुंतवणूकीत अधिक संतुलित दृष्टिकोन आवश्यक झाला आहे. सोने हे प्रामुख्याने पोर्टफोलिओला स्थिरता देण्याचे काम करते. ते चलनवाढीपासून भक्कम बचाव करते. तसेच अस्थिरतेच्या काळात आपल्या गुंतवणूकीला सुरक्षितताही प्रदान करते. त्यामुळे आजच्या गुंतागुंतीच्या आर्थिक जगतात, केवळ दागिने किंवा सोने नाण्यांचा साठा करण्याव्यतिरिक्त गुंतवणुकीत सोन्याला स्थान देण्याबाबत फेरविचार करण्याची वेळ आली आहे.

दागिन्यांच्या रुपातील सोने हे गेल्या कित्येक दशकांपासून असंख्य भारतीय कुटुंबांचा अविभाज्य घटक आहे. सोन्याला सांस्कृतिक आकर्षणाचे कोंदण असले तरी भौतिक रुपातील सोने, दागदागिन्यांना सुरक्षित साठवणुकीचे आव्हान आहे.

डोळे दिपवणारी कामगिरी

सोन्याने बहुतेक कालावधीत समभागांपेक्षा उत्तम कामगिरी केलेली आहे. ऐतिहासिकदृष्ट्या त्याचे परतावा-जोखीम गुणोत्तरही सरस राहिलेले आहे. गुंतवणूकदारांना चक्रवाढ दराने १५ टक्के वार्षिक परतावा मिळालेला आहे. जागतिक आर्थिक संकट, महामारीची अनिश्चितता किंवा भू-राजकीय पातळीवरील उलथापालथीत पोर्टफोलिओमध्ये कोणतीही अस्थिरता सोने तयार होऊन देत नाही. या गुणांमुळेच सोने हे गुंतवणूकीसाठी एक आकर्षक निवड ठरली आहे.

गुंतवणुकीचे स्मार्ट मार्ग

गोल्ड ईटीएफ: याचे शेअर बाजारात व्यवहार केले जातात. या फंडाचे युनिटस सोन्याच्या किमतींवरच अवलंबून असतात. गोल्ड इटीएफमध्ये गुंतवणूक करण्यासाठी युनिट्सच्या साठवणूकीसाठी डीमॅट खाते आणि त्यामध्ये व्यवहार करण्यासाठी ट्रेडिंग खाते आवश्यक असते.

गोल्ड इटीएफ फंड ऑफ फंड्स (एफओएफ): गुंतवणूकदार स्वतःच्या पोर्टफोलिओमध्ये सोन्यात गुंतवणूक करण्यासाठी एफओएफ पर्यायाचा वापर करू शकतात. सामान्यतः ज्या किरकोळ गुंतवणूकदारांकडे डीमॅट आणि ट्रेडिंग खाते नाही, त्यांच्यासाठी हा फंड तयार करण्यात आलेला आहे, गुंतवणूकदार एसआयपी, एसटीपी आणि एकरकमी गुंतवणूकीव्दारे या फंडात गुंतवणूक करू शकतात. गोल्ड एफओएफ व्यवहारातील अडचणी देखील दूर करतात आणि सोन्यात गुंतवणूक करण्यासाठी गुंतवणूकदारांना हव्या त्याक्षणी संधी प्रदान करतात.

सोने पोर्टफोलिओसाठी लक्ष्मी

धनत्रयोदशीला बहुसंख्य कुटुंब लक्ष्मीपूजन करतात आणि समृद्धीची प्रार्थना करतात, त्यामुळे पोर्टफोलिओमध्ये सोने समाविष्ट करण्याचा पर्याय अजूनही आकर्षक आहे. इटीएफ असो किंवा एफओएफ असो, सोने केवळ संपत्तीचे रक्षण करत नाही तर शेअरबाजारातील अस्थिरतेदरम्यान स्थिरता प्रदान करताना दीर्घकालीन परतावा देखील देऊ शकते. आजच्या अस्थिर गुंतवणूक परिस्थितीत, सोने हे संपत्ती निर्मितीचा सुवर्णधारी साथीदार ठरली आहे.

शुद्धता, सोन्याची सुरक्षित पध्दतीने साठा करण्याबाबत असलेल्या अडचणींचा विचार गोल्ड इटीएफ पर्यायामुळे दूर झाला आहे. गोल्ड इटीएफरुपी डिजिटल पर्यायामुळे गुंतवणूकदाराला आपल्या सोन्याची कोणतीही भौतिक हाताळणीची गरज राहिलेली नाही.

प्रशांत पिंपळे, मुख्य गुंतवणूक अधिकारी, फिक्सड् इनकम, बडोदा बीएनपी परिबा म्युच्युअल फंड

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news