Godavari River Hyacinth | नाशिकची जीवनवाहिनी श्वास गुदमरतेय! गोदावरीला पानवेलींचा विळखा; नदीचे पाणी झाले हिरवेगार

Godavari River Hyacinth | नाशिकची जीवनवाहिनी असलेल्या गोदावरी नदीत सध्या मोठ्या प्रमाणात पानवेली (जलवनस्पती) साचल्याने नदीचे पाणी हिरवेगार झाले आहे.
Bhima River Water Hyacinth
Bhima River Water HyacinthPudhari
Published on
Updated on

नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा

नाशिकची जीवनवाहिनी असलेल्या गोदावरी नदीत सध्या मोठ्या प्रमाणात पानवेली (जलवनस्पती) साचल्याने नदीचे पाणी हिरवेगार झाले आहे. गंगापूर गावापासून ते नांदूर-मानूरपर्यंत अनेक ठिकाणी पानवेलींचा प्रचंड फैलाव झाल्याचे दिसून येत आहे.

Bhima River Water Hyacinth
Nashik Human Trafficking Case | इव्हेंटच्या कामाचे आमिष अन् थेट लग्नाचा मांडव! 19 वर्षीय तरुणीची 2 लाखांत विक्री...

यामुळे नदीचे नैसर्गिक प्रवाह बाधित होत असून, जलचरांसाठी तसेच पाण्याच्या गुणवत्तेसाठी ही परिस्थिती धोकादायक ठरत आहे. गोदाकाठावरही मोठ्या प्रमाणात पनवेली पसरल्याने नदीकाठाची स्वच्छता बिघडली आहे.

प्रदूषण नियंत्रणासाठी शासनस्तरावर मोठा गाजावाजा होत असताना आणि हजारो कोटींच्या योजना जाहीर झालेल्या असतानाही प्रत्यक्षात अपेक्षित परिणाम दिसून येत नाही.

Bhima River Water Hyacinth
Simhastha Kumbh Mela 2026 | जेथे गोदावरी नाही, तेथे स्नानाचा अट्टाहास कशासाठी ?

सांडपाणी, कचरा व अन्य प्रदूषक घटकांमुळे पानवेलीची वाढ वेगाने होत आहे. त्यामुळे गोदावरी स्वच्छतेसाठी ठोस नियोजन करून प्रदूषण करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, तसेच नदीतील पानवेली तातडीने हटवावी, अशी मागणी नाशिककरांकडून होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news