Girish Mahajan Nashik development |त्रास मान्य पण, कधी नव्हे, तो नाशिकचा विकास

Girish Mahajan Nashik development - कुंभमेळामंत्री महाजन यांची छगन भुजबळांना कोपरखळी
Girish Mahajan
Girish Mahajan NewsFile Photo
Published on
Updated on

नाशिक : सिंहस्थकामांना होणारा विलंब, रस्ते खोदल्यामुळे नाशिककरांना होणारा त्रास मान्य आहे. कुंभमेळामंत्री म्हणून याची सर्वस्वी जबाबदारीदेखील माझीच आहे. पण, सिंहस्थानिमित्त नव्या नाशिकची निर्मिती होत आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात नाशिकचा विकास आजवर कधीही झाला नाही, अशा शब्दांत कुंभमेळामंत्री गिरीश महाजन यांनी अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षणमंत्री छगन भुजबळ यांना कोपरखळी मारली आहे.

शहरातील रस्त्यांवरील खड्डे आणि त्यामुळे अपघात होऊन बळी जाणाऱ्यांच्या वाढत्या संख्येकडे लक्ष वेधत मंत्री भुजबळ यांनी शुक्रवारी (दि. ३१) कुंभमेळामंत्री महाजनांवर शरसंधान साधले. कुंभमेळामंत्री महाजन यांनी या प्रश्नात लक्ष घालावे अन्यथा हा विषय मंत्रिमंडळ बैठकीत आणि मुख्यमंत्र्यांसमोर मांडणार असल्याची आक्रमक भूमिका भुजबळ यांनी मांडली होती. त्यावर खड्यांसंदर्भात आयोजित बैठकीनिमित्त नाशिकमध्ये आलेल्या मंत्री महाजन यांनी भुजबळांना प्रत्युत्तर दिले.

Girish Mahajan
Waterborne disease prevention | जलजन्य आजारांचा धोका; जि.प. अॅक्शन मोडवर

भुजबळांचा त्रागा खराच आहे. खड्ड्यांमुळे होणाऱ्या दुर्घटना दुर्दैवी आहेत. रस्ते दुरुस्तीसाठी युद्धपातळीवर मोहीम राबविण्याचे आदेश देण्यात आले आहेत. आठवडाभरात नाशिक खड्डेमुक्त होईल. सिंहस्थकामांमुळे आणखी चार- विकासासाठी सहा महिने नाशिककरांना त्रास होईल. शहराच्या नाशिकककरांनी कळ सोसावी. याबद्दल कुंभमेळामंत्री म्हणून आपण नाशिककरांची दिलगिरीदेखील व्यक्त केली आहे. परंतु एवढ्या मोठ्या प्रमाणावर नाशिकचा विकास कधीही झाला नाही.

Girish Mahajan
Nashik flood damage| जिल्ह्यात पुरामुळे एकाचा मृत्यू; दोनशेहून अधिक घरांचे नुकसान

सिंहस्थाच्या नावाने नवीन नाशिक उभे राहात आहे. येत्या सहा महिन्यांत सर्व कामे पूर्ण होतील. तेव्हा नाशिककरच या कामांचे कौतुक करतील, असा दावा महाजन यांनी केला. नाशिकला पालकमंत्री नसल्याबाबत प्रश्न विचारला असता, मी कुठे कमी पडलो का, असे सांगताना नाशिकककरांना पालकमंत्र्याची कमतरता जाणवू देणार नाही, अशी ग्वाही महाजन यांनी दिली.

चौधरींच्या राजीनाम्याने विषय संपला !

एकनाथ शिंदे आणि रक्षा खडसे यांच्याविषयी मंत्री महाजन आणि भाजपचे उत्तर महाराष्ट्र संघटक विजय चौधरी यांच्यातील वादग्रस्त संभाषणाच्या व्हायरल क्लिपविषयी मंत्री महाजन यांना विचारले असता, या प्रकरणात चौधरी यांच्यावर पक्षाने कारवाई केली आहे. त्यांचा राजीनामा घेण्यात आला असून, पक्षाशी त्यांचा काहीही संबंध उरलेला नाही, असे सांगत मंत्री महाजन यांनी या विषयावर पडदा पडल्याचे स्पष्ट केले

शिवसेनेचे आंदोलन मैत्रीपूर्ण!

नाशिक महापालिकेतील भाजपच्या सत्तेत शिवसेना (शिंदे गट) घटकपक्ष असूनदेखील शिवसेनेने गुरुवारी खड्ड्यांसंदर्भात आंदोलन केले. याविषयी महाजन यांना विचारले, त्यांनी शिवसेनेला चिमटा काढला. ते म्हणाले की, मनपा निवडणुकीत शिवसेनेने भाजपसोबत मैत्रीपूर्ण लढती केल्या. आता सत्तेत असताना त्यांनी मैत्रीपूर्ण आंदोलन केले असेल, अशी टीका महाजन यांनी केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news