

नाशिक: मंत्री गिरीश महाजन यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन करण्यात आले. तसेच प्रफुल्ल लोढा यांची नार्को-टेस्ट करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली. शेतकऱ्यांच्या कर्जमाफी, वीज कनेक्शनसारख्या मूलभूत समस्यांकडे लक्ष न देता सरकारचे दुसऱ्याच प्रश्नांवर लक्ष देत आहे. असा प्रश्न उपस्थित करत राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) तर्फे हे आंदोलन करण्यात आले.
हनी ट्रॅप प्रकरणातील प्रफुल्ल लोढाची नार्को-टेस्ट करण्यात यावी, अशी मागणी आंदोलकांनी केली. लोढा यांच्या म्हणण्यानुसार, “बटन दाबल्यावर देशभरात तहलका माजेल,” या दाव्याच्या पार्श्वभूमीवर या प्रकरणाची सीबीआय चौकशी झालीच पाहिजे, असेही ते म्हणाले. शेतकरी दुष्काळ आणि दुबार पेरणीच्या संकटात सापडले असताना, जामनेरचे भाऊ स्वतःच्या द्वेषी राजकारणात व्यस्त आहेत. हनी ट्रॅप प्रकरणात दबाव निर्माण करण्यासाठी जामनेरच्या भाऊंनी कार्यकर्त्यांकडून आंदोलन घडवून आणले; पण शेतकऱ्यांच्या कर्जमाफी, वीज कनेक्शन यांसारख्या प्रश्नांवर तुमचे शहाणपण कुठे जाते, असा सवाल आंदोलकांनी केला. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर मूग गिळून गप्प बसलेल्या जामनेरकर भाऊंचा निषेध असो, अशा आशयाची बॅनर्स हातात धरून घोषणाबाजी करण्यात आली.
या आंदोलनात अशोकभाऊ लाडवंजारी, रामदास पाटील, सुनील भैया माळी, राजूभाऊ माळी, गणेश पाटील, किशोर गायकवाड,बबलू भाऊ सापदारे, किरण भाऊ राजपूत, नवीन भाई खाटी, नंदू भाऊ हीरोळे, बापू भाऊ ससाने, डॉ. अभिषेक ठाकूर, संदीप भाऊ जावळे, प्रशांतभाऊ भाल शंकर, संजय भाऊ कोळी, जाफर भाई शेख, सतीश पाटील, प्रदीप बडगुजर, अजय पाटील, जगदीश कोळी, अमित वाणी, रोहन महाजन, राजूभाऊ मोरे, इब्राहिम तडवी सर, आकाश हिवाळे, चेतन पवार, एजाज खान,भला भाऊ तडवी, समाधान वाघ, संतोष मोरे, गणेश पाटील, रफिक पटेल आदींची उपस्थिती होती.