Gen Z News Consumption | 'जेन झी'ची बातमी पाहण्याची पद्धत बदलतीय

Gen Z News Consumption | सोशल मीडियावरून बातम्या समोर, विश्वासार्ह माध्यमांनाही महत्व
Mobile rules
या' शहरात मोबाईलबाबत कडक नियम
Published on
Updated on

नाशिक : खुशी गोराडे
सोशल मीडिया स्क्रोल करताना बातमी समोर येणे, व्हिडिओच्या माध्यमातून माहिती घेणे आणि आवडलेल्या विषयावर पुढे शोध घेणे, हा जेन झी च्या बातम्या जाणून घेण्याचा पॅटर्न बदलत आहे. त्याचा परिणाम माध्यमांच्या बातमी मांडणीवरही होत असलेला दिसून येत आहे.

Mobile rules
Nashik Malnourished Children | नाशिक जिल्ह्यात 3,672 बालके कुपोषित; जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांचे निर्मूलनाचे कडक आदेश!

गूगल आणि कँटारच्या 'ब्रिजिंग द गॅप : री इमॅजिनिंग न्यूज फॉर जेन झी' अभ्यास करण्यात आला. त्यानुसार, भारतातील ४ हजारांहून अधिक जेन झी तरुणांचा अभ्यास करण्यात आला. त्यातील ६५ टक्के तरुणांना बातम्या त्या मुद्दाम शोधण्याऐवजी सोशल मीडिया स्क्रोलिंग किंवा इतर कामांदरम्यान सहज समोर येतात.

९१ टक्के तरुण बातम्यांसाठी सोशल मीडिया, तर ८८ टक्के व्हिडिओ प्लॅटफॉर्मचा वापर करतात. जेन झीला बातमी विश्वासार्ह, दृश्यात्मक, संबंधित आणि भावनिकदृष्ट्या परिणामकारक असावी, अशी अपेक्षा असल्याचे अभ्यासातून समोर आले आहे. मात्र, डिजिटल माध्यमांचा वाढता वापर असला, तरी विश्वासाच्या बाबतीत वृत्तसंस्थांना अद्याप महत्त्व आहे. अभ्यासानुसार, ४७ टक्के तरुणांचा वृत्तसंस्थांवर विश्वास असून, क्रिएटर्सबाबतीत हे प्रमाण सुमारे ३८ ते ३९ टक्के आहे.

Mobile rules
ICU NICU Safety Audit | अमरावती दुर्घटनेनंतर नाशिक प्रशासन ॲक्शन मोडमध्ये; सर्व रुग्णालयांना फायर अन् इलेक्ट्रिकल ऑडिटचे आदेश!

रॉयटर्स इन्स्टिट्यूटच्या अभ्यासातूनही तरुणांसाठी सोशल मीडिया हा बातम्यांपर्यंत पोहोचण्याचा महत्त्वाचा मार्ग दिसतो. त्यामुळे माध्यम संस्था शॉर्ट व्हिडिओ, सोशल मीडिया, संवादात्मक मांडणी आणि तरुण पत्रकारांना अधिक व्यासपीठ देण्यासारखे प्रयोग करत आहेत.

मात्र, डिजिटलचा वेग वाढला म्हणून मुद्रित माध्यमांचे महत्त्व कमी होत नाही. बातमीची पडताळणी, संपादकीय छाननी, संदर्भासह माहिती आणि सखोल मांडणी ही मुद्रित माध्यमांची बलस्थाने आहेत.

माहितीच्या वाढत्या गर्दीत निवडक आणि विश्वासार्ह माहिती वाचकांपर्यंत पोहोचवण्याची भूमिका वर्तमानपत्रे बजावत आहेत. त्यामुळे भविष्यात प्रश्न केवळ 'डिजिटल की प्रिंट' असा नसून, डिजिटल माध्यमांचा वेग आणि मुद्रित माध्यमांची विश्वासार्हता व सखोलता यांचा समतोल साधून नव्या पिढीपर्यंत बातमी कशी पोहोचवायची, हा असणार आहे.

"मला इंस्टाग्राम आणि यूट्यूबवर बातमी पटकन समजते. पण मोठ्या किंवा महत्त्वाच्या बातमीसाठी विश्वासार्ह बातमी संस्थेकडे जातो."

— आदित्य पोमणार, विद्यार्थी

"सोशल मीडियावर बातमी समोर येते. त्यामुळे मुद्दाम शोधण्याची गरज पडत नाही. व्हिडिओ किंवा छोट्या माहितीमधून विषय समजायला सोपा वाटतो."

— पलक सावंत, विद्यार्थिनी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news