

नाशिक : स्मार्ट सिटी कंपनीने गावठाण पुनर्विकास योजनेंतर्गत पंचवटीतील इंद्रकुंड ते वाघाडी नाल्या दरम्यान केलेल्या मलवाहिकांच्या कामात अनेक गंभीर त्रुटी आढळल्या आहेत. त्यामुळे या परिसरात राबविण्यात येणाऱ्या महत्त्वाकांक्षी 'राम काल पथ' प्रकल्पाचे भवितव्य अडचणीत आले आहे. या संदर्भात महापालिका स्मार्ट सिटी कंपनीकडून खुलासा मागविण्यात वेणार आहे.
स्मार्ट सिटी कंपनीच्या कामांविषयी अनेक तक्रारी आहेत. आता गावठाण विकास योजनेच्या कामातही गंभीर स्वरूपाच्या चुका झाल्याचे समोर आले आहे. गावठाण विकास प्रकल्पांतर्गत जलशुद्धीकरण केंद्र, जलकुंभ, जलवाहिनी, रस्ते बांधणी, मलजलनिःसारण व्यवस्था, पथदीप व रस्तेविकास कामे करण्यात आली. जवळपास २०० कोटींची कामे होती. या कामांमधील त्रुटी पंचवटीतील गोदाघाट परिसरात रामविष्यात येत असलेल्या राम काल पथ प्रकल्पाच्या मार्गात अडथळा ठरल्या आहेत.
राम काल पथ प्रकल्पावर एकूण १४६.१० कोटी रुपये खर्च होणार आहेत. हा प्रकल्प तीन टप्प्यांत साकारताना रामकुंड व गोदाघाटावरील कामाचा अधिक समावेश आहे. तेथे पुन्हा रखोदकाम होऊ नये व चुकीच्या कामाचे खापर महापालिकेवर फुटू नये यासाठी मलनिःसारण विभागाच्या अधिकाऱ्यांनी पाहणी केली. त्यात स्मार्ट सिटी कंपनीने गावठाण विकास योजनेंतर्गत केलेल्या मलवाहिकांच्या कामात जवळपास २० हुन अधिक त्रुटी आढळून आल्या असून, त्याचा अहवाल मलनिःसारण विभागाने सादर केला आहे. याबाबत स्मार्ट सिटी कंपनीला पत्र पाठवून खुलासा मागविला जाणार आहे.
अशा आहेत त्रुटी
इंद्रकुंडापासून रामकुंड पोलिस चौकी व सरदार चौकापासून पुढे तपोवन मलनिःसारण केंद्रापर्यंत जाणारी मलवाहिका व पावसाळी गटार स्वतंत्र असणे आवश्यक असताना, दोन्ही वाहिका एकत्र करण्यात आल्याने पावसाळी पाणी व मलजल एकत्र वाहून येत आहे. वाघाडी नाल्यात टाकलेल्या मलवाहिका थेट मलनिःसारण केंद्राला जोडल्या आहेत. रामकुंड ते सरदार चौक दरम्यान मलवाहिकांना अनेक ठिकाणी सिमेंट काँक्रीट करण्याऐवजी गोण्या लावल्याचे तपासणीत आढळले.
66 महापालिकेच्या मलनिःसारण विभागाने केलेल्या पाहणीत स्मार्ट सिटी कंपनीमार्फत करण्यात आलेल्या गावठाण पुनर्विकास योजनेच्या कामात त्रुटी आढळल्या आहेत. यासंदर्भात स्मार्ट सिटी कंपनीकडे पत्रव्यवहार करून खुलासा मागवला जाणार आहे.
प्रदीप चौधरी, अतिरिक्त आयुक्त, महापालिका