Ganpati Bappa Yenar Ghari : 'नाद निनादला रे मोरया... ढोल धडाडला'

गणपती बाप्पा येणार घरी: सरावातून गुंजतोय नाशिक ढोलचा नाद; चिमुकल्यांचाही समावेश
Nashik Dhol
‌'श्रीं'च्या स्वागतासाठी 'नाशिक ढाेल'चा निनाद सरावातून वेग धरतोय. (छाया : हेमंत घोरपडे)
Published on
Updated on

नाशिक : गणेशोत्सव महिनाभरावर येऊन ठेपला आहे. ‌'श्रीं'च्या स्वागतासाठी शहर व परिसरात ढोल वादनाच्या सरावाला रंग चढत आहेत. पंचवटी, नवीन नाशिकसह शहरातील विविध भागांत ढोल वादनाचा निनाद उमटत आहे. (Ganeshotsav is almost a month away)

गणशोत्सवाच्या स्वागत मिरवणुकीत सांस्कृतिक परंपरा म्हणून आणि गणेशभक्तांमध्ये जोश संचारावा यासाठी ढोल वादन हे सुरेख पद्न्यास आणि ध्वज उंचावून केले जाते. 'नाशिक ढाेल'चा निनाद, तर जगभरात प्रसिद्ध आहेच. गेले काही दिवस शहर व परिसरात ढोल वादन सरावाचा निनाद उमटत आहे. वादक अत्यंत उत्साहाने आणि भारलेल्या ऊर्जेने ढोल-ताशा टोल यांचा सराव करताना दिसत आहेत.

Nashik Dhol
पथकाच्या सरावातून ढोल घुमू लागला.(छाया : हेमंत घोरपडे)

पथकांच्या सरावाला आला वेग

मानाच्या चांदीच्या गणपतीसाठी सालाबादाप्रमाणे यंदाही सहस्रनाद पथकाचे ढोल वादन रंगणार आहे. 'तालरुद्र', 'सहस्रनाद', 'विघ्नहरण ढोल' पथक यांसह शहरात अनेक पथकांच्या सरावाने वेग घेतला आहे. गंगापूर रोड - मखमलाबाद रोडवरील कोशिरे मळा भागात धनदायी लॉन्सजवळील पटांगणातही ढोल वादनासाठी गणेशभक्तांचा उत्साह दिसत आहे. एकूणच पावसाच्या आनंदसरींनी सर्वत्र आनंद संचारला असताना भरपावसातही ढोल वादनाच्या तालबद्ध निनादाने चैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे.

रोज 300 हून अधिक ढोल वादक वादनाचा सराव करत आहेत. त्यात २० बालवादकही आहेत. पोलिस आयुक्तांसह सर्वच पोलिस विभागाचे उत्तम सहकार्य मिळत आहे. यंदा वादनासाठी ध्वज संख्याही वाढवली असून, काही दाक्षिणात्य तसेच उत्तर भारतीय संगीत परंपरेतील ताल ढोल वादनात नव्याने समाविष्ट करत आहोत.

अमी छेडा, सहप्रमुख, सहस्रनाद ढोल पथक, नाशिक.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news