Nashik Mobile Snatching | मोबाइल स्नॅचिंग करणाऱ्या सराईत टोळीचा पर्दाफाश

Nashik Mobile Snatching | शहरात पादचाऱ्यांचे मोबाइल हिसकावून पसार होणाऱ्या सराईत मोबाइल स्नॅचर्सच्या टोळीचा गंगापूर पोलिसांनी पर्दाफाश केला असून, दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे.
Mobile Theft
Mobile TheftPudhari
Published on
Updated on

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

शहरात पादचाऱ्यांचे मोबाइल हिसकावून पसार होणाऱ्या सराईत मोबाइल स्नॅचर्सच्या टोळीचा गंगापूर पोलिसांनी पर्दाफाश केला असून, दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यांच्या ताब्यातून विविध महागड्या कंपन्यांचे २१ मोबाइल फोन व ५ चोरीच्या मोटारसायकली, असा एकूण ६ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

Mobile Theft
Nanded Crime : नांदेडमध्ये दोन पिस्टलसह जिवंत काडतूस जप्त

ज्ञानेश्वर ऊर्फ नन्या मोतीराम दिवे (रा. गोवर्धन गाव) व गोवर्धन ऊर्फ गौरव गोपाळ शेवरे (२०, रा. हाथरुंडी, पेठ) ही ताब्यात घेतलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत. २ मे २०२६ रोजी दुपारी डी. के. नगर परिसरात फिर्यादीचा मोबाइल दोन जणांनी पल्सर मोटारसायकलवर येत हिसकावून नेल्याची घटना घडली होती.

या प्रकरणी गंगापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक शरमाळे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाने सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास सुरू केला. तपासादरम्यान पोलिस अंमलदार सुजित जाधव यांनी सराईत आरोपी ज्ञानेश्वर ऊर्फ नन्या मोतीराम दिवे (रा. गोवर्धन गाव) याची ओळख पटवली. त्यानंतर पोलिसांनी गोवर्धन ऊर्फ गौरव शेवरे यालाही ताब्यात घेतले.

Mobile Theft
Satara Crime: कुरणेवाडी दरोड्यातील टोळी जेरबंद

चौकशीत दोघांनी मिळून शहरातील नागरिकांचे मोबाइल हिसकावल्याची कबुली दिली. त्यांच्या ताब्यातून २१ मोबाइल फोन तसेच आंबड, निफाड, सातपूर, नाशिक तालुका आणि गणेशपुरी पोलिस ठाण्यांच्या हद्दीतून चोरीस गेलेल्या एनएस १२५ पल्सर, होंडा शाइन, ड्रीम युगा, अॅक्टिव्हा आणि स्प्लेंडर या पाच दुचाकी जप्त करण्यात आल्या.

या कारवाईमुळे मोबाइल स्नॅचिंगचे दोन आणि वाहन चोरीचे पाच असे एकूण सात गुन्हे उघडकीस आले आहेत. ही कारवाई पोलिस आयुक्त संदीप कर्णिक, पोलिस उपआयुक्त मोनिका राऊत आणि सहायक पोलिस आयुक्त सुधाकर सुराडकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

कारवाईत वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक शरमाळे, सपोनि तुषार देवरे, पोहवा गिरीश महाले, रवींद्र मोहिते, भागवत येवले, पोअं सुजित जाधव, गोरख साळुंके, प्रवीण केदारे, तुळशीदास चौधरी, मच्छिंद्र वाकचौरे, मनोज भोये, यशराज पोतन, घनश्याम भोये, सागर बोधले व दीपक दुसाने यांनी सहभाग घेतला. पुढील तपास पोहवा गिरीश महाले करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news