Ganesh Idol Sale Stalls | गणेशमूर्ती विक्रीसाठी ३२ ठिकाणी २८३ स्टॉल्स, महापालिकेतर्फे मंगळवारी जाहीर लिलाव

गणेशमूर्ती विक्रीसाठी ३२ ठिकाणी २८३ स्टॉल्स
Ganesh Idol Sale Stalls
Ganesh Idol Sale Stalls
Published on
Updated on

नाशिक : महापालिकेने आगामी गणेशोत्सवाची तयारी सुरू केली आहे. सार्वजनिक गणेश मंडळांसाठी ऑनलाइन परवानगी प्रक्रिया सुरू करताना गणेशमूर्ती विक्रीसाठी शहरात विविध ३२ ठिकाणी तब्बल २८३ स्टॉल्सची उभारणी केली जाणार आहे. यासाठी महापालिकेच्या वतीने मंगळवारी (दि. २५) लिलाव प्रक्रिया राबवली जाणार आहे.

येत्या १४ सप्टेंबरपासून गणेशोत्सवाला सुरुवात होत आहे. गणरायाच्या स्वागतासाठी सार्वजनिक गणेश मंडळे तसेच भाविकांकडून तयारी केली जात आहे. सार्वजनिक मंडळांकडून शहरात देखावे उभारले जातात, तर भाविकांकडून घरोघरी श्रींची प्रतिष्ठापना केली जाते. सार्वजनिक गणेश मंडळांना आरास उभारण्यासाठी विविध विभागांची परवानगी, ना हरकत दाखले घ्यावे लागतात. यात मंडळांच्या कार्यकर्त्यांना मोठा त्रास सहन करावा लागतो.

सर्वच परवानगी एका ठिकाणी मिळण्यासाठी मनपाने एक खिडकी योजना सुरू केली आहे. मंडप उभारण्यासाठी एक महिना आधी परवानगी अर्ज सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मंडप, कमानी उभारण्यासह विविध परवानगीसाठी मनपाने ऑनलाइन प्रक्रियेस सुरुवात केली आहे. गणेशमूर्ती विक्रीसाठी मनपातर्फे दरवर्षी स्टॉल्सचे लिलाव केले जातात. यंदा २५ ऑगस्टला सहा विभागीय कार्यालयांच्या स्तरावर स्टॉल्ससाठी लिलाव होतील. प्रथम लिलावास प्रतिसाद न मिळाल्यास २७ ऑगस्टला विभागीय कार्यालयांत लिलाव घेण्यात येतील. यंदा सहाही विभागांमध्ये २८३ गणेश मूर्ती स्टॉल्सची उभारणी केली जाणार आहे. यात सर्वाधिक १०५ स्टॉल्स नाशिकरोड विभागात उभारले जातील.

विभागनिहाय स्टॉल्स विभाग स्टॉल्स संख्या

नाशिक पूर्व १५

नाशिक पश्चिम ४०

पंचवटी ५८

सातपूर १९

सिडको ४६

नाशिकरोड १०५

एकूण २८३ १० हजार रुपये

अनामत गणेशमूर्ती विक्री स्टॉल्सच्या लिलावात भाग घेणाऱ्यांना प्रत्येक स्टॉलच्या जागेसाठी १० हजार रुपये अनामत रक्कम भरावी लागणार आहे. रहिवासी पुराव्यासह आधारकार्ड, निवडणूक ओळखपत्र, वाहन परवाना, पॅनकार्ड, वीजबिल, बँक पासबुक, छायांकित २ साक्षांकित प्रतींसह सादर करावी लागणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news