

नाशिक : जिल्हा शासकीय रुग्णालयातर्फे जिल्ह्यातील सिन्नर ग्रामीण रुग्णालय व चांदवड उपजिल्हा रुग्णालयात मोफत डायलिसिस केंद्र कार्यान्वित करण्यात आले आहे. सिन्नर ग्रामीण रुग्णालयात ७ एप्रिल रोजी डायलिसिस केंद्र सुरू झाले आहे. डिसेंबरपर्यंत १८ रुग्णांनी ७९३ डायलिसिस सेवेचा लाभ घेतला. चांदवड उपजिल्हा रुग्णालयात २७नोव्हेंबरपासून ही सुविधा सुरू झाली आहे. डिसेंबरपर्यंत ४ रुग्णांनी १७डायलिसिस सत्र यशस्वीपणे घेतले.
शासन व एचएलएल लाइफकेअर लिमिटेडच्या संयुक्त विद्यमाने ही मोफत डायलिसिस सेवा सुरू करण्यात आली आहे. किडनी निकामी झालेल्या रुग्णांच्या शरीरातील अतिरिक्त पाणी, विषारी व टाकाऊ पदार्थ मशीनद्वारे बाहेर काढण्याची प्रक्रिया म्हणजे डायलिसिस आहे.
किडनीचे कार्य १० ते १५ टक्क्यांपेक्षा कमी झालेल्या रुग्णांसाठी ही सेवा अत्यंत आवश्यक ठरते. क्रोनिक किडनी डिसीज, अॅक्युट किडनी इन्ज्युरी, शरीरात किंवा फुप्फुसात पाणी साचणे, पाय सुजणे, रक्तातील युरिया क्रिएटिनिन व पोटॅशियमचे प्रमाण वाढणे अशा तक्रारी असलेल्या रुग्णांसाठी ही डायलिसिस केंद्रे उपयुक्त ठरत आहेत.
सिन्नर ग्रामीण रुग्णालयात ५ आणि चांदवड उपजिल्हा रुग्णालयात ८ वातानुकूलित डायलिसिस बेड, किडनी विकार तज्ज्ञ, फिजिशियन दोन डायलिसिस टेक्निशियन, स्टाफ नर्स व स्वच्छता कर्मचारी अस आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यात आला आहे. खासर्ग रुग्णालयात एका वेळच्य डायलिसिससाठी साधारण ४ हजार रुपयांपर्यंत खर्च येतो. आठवड्यातून दोनदा डायलिसिस करावे लागल्यास महिन्याला २४ हजार रुपयांच आर्थिक भार रुग्णांवर पडतो. सिन्नर क चांदवडला मोफत डायलिसिस सेव उपलब्ध झाल्याने सर्वसामान्य रुग्णांचा हा आर्थिक भार मोठ्य प्रमाणात कमी होणार आहे. जिल्ह्यातील अधिकाधिक गरज रुग्णांनी या मोफत डायलिसिस सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. चारुदत्त शिंदे यांनी केले.