Ashok Kharat Case | पुण्यातील बिल्डरकडून भोंदू खरात याने उकळली मर्सिडिजसह 5 कोटींची खंडणी

Ashok Kharat Case |
Ashok Kharat Case | पुण्यातील बिल्डरकडून भोंदू खरात याने उकळली मर्सिडिजसह 5 कोटींची खंडणी
Published on
Updated on

नाशिक : भोंदू अशोक खरात याचा आणखी एक धक्कादायक कारनामा उघडकीस आला असून पुण्यातील एका बांधकाम व्यावसायिकाकडून तब्बल पाच कोटी रुपयांची खंडणी उकळल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच मर्सिडीज कार गिफ्ट म्हणून बळजबरीने घेण्यास भाग पाडल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी सरकारवाडा ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी राजेंद्र जासूद (51, रा. हडपसर, पुणे) यांनी दिलेल्या माहितीनुसार, 2018 साली त्यांची खरातसोबत ओळख झाली. परदेशात लॉजिस्टिक व्यवसाय सुरू करण्यासाठी त्यांनी खरातचा सल्ला घेतला होता. यावेळी अवतारपूजा करण्यासाठी परदेश दौरे करणे आवश्यक असल्याचे सांगत खरातने त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात खर्च करवून घेतला. म्यानमार, ग्रीनलँड तसेच अमेरिका दौर्‍यांसाठी लाखो रुपये खर्च करण्यास भाग पाडण्यात आले.

भोंदू खरातचे कार्यालय आणि बँक खातेही सील

अनेक महिलांचे शोषण केल्याचा आरोप असलेल्या भोंदू अशोक खरात प्रकरणात विशेष तपास पथकाने त्याचे ‘ओकस कार्यालय’ आणि त्याच्या ‘शिवनिका’ संस्थेचे बँक खाते सील केले आहे.

अश्लील व्हिडीओ व्हायरल करणार्‍यांविरुद्ध गुन्हा दाखल

भोंदू अशोक खरात प्रकरणातील पीडित महिलांचे अश्लील व्हिडीओ सोशल मीडियावर प्रसारित केल्याच्या गंभीर प्रकाराची दखल घेत नाशिक पोलिसांनी कठोर कारवाई सुरू केली आहे. याप्रकरणी अहिल्यानगर जिल्ह्यातील तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्लास्टिकचा साप जप्त

भोंदू खरात आपल्या घरात प्लास्टिकचा साप दाखवून धार्मिक विधी करीत असे. यासंदर्भात जादूटोणा कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, एसआयटी टीमने प्लास्टिकचा 20 फुटी साप जप्त केला आहे. या प्रकरणात नाशिक रोड परिसरातील दोन सराफ ‘रडार’वर आहेत. तसेच खरातने वापरलेल्या काडतुसांचा तपास सुरू झाला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news