

पुढारी ऑनलाइन डेस्क : माजी मंत्री मधुकर पिचड यांचे निधन झाले आहे. ते 84 वर्षांचे होते. ब्रेनस्ट्रोक आल्याने नाशिक येथील नाइन पल्स रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. उपचारादरम्यान, त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
मधुकर पिचड यांनी 1980 ते 2004 या काळात नगरमधील अकोले विधानसभा मतदारसंघातून विधानसभेचे आमदार म्हणून सलग सात वेळा काम केले आहे. मार्च 1995 ते जुलै 1999 या काळात ते महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते आहेत. मधुकर पिचड राजकीय कारकिर्दीच्या सुरुवातीपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे सदस्य होते, परंतु 2019 मध्ये त्यांनी त्यांचा मुलगा वैभव पिचड यांच्यासह भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष म्हणून देखील काम पाहिले होते.
पाच वर्षांपूर्वी विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर मधुकर पिचड यांनी सुपुत्र वैभव पिचड यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसची साथ सोडून भारतीय जनता पक्षात प्रवेश केला होता. मात्र काहीच दिवसांपूर्वी त्यांनी शरद पवार यांच्याशी गाठीभेटी वाढवल्याने ते पुन्हा पवारांच्या राष्ट्रवादीत येण्याच्या चर्चांना उधाण आले होते.
दरम्यान, गेल्या 15 ऑक्टोबरदरम्यान त्यांना त्यांच्या अहमदनगर जिल्ह्यातील राजूर येथील राहत्या घरी ब्रेन स्ट्रोक आला होता. पहाटेच्या सुमारास ही घटना घडली होती. तेव्हापासून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सुरुवातीला त्यांनी उपचाराला प्रतिसाद दिला होता. मात्र, आता त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर येत आहे. याबाबत डॉक्टरांकडून कुठलीही अधिकृत माहिती दिली गेली नाही.
गाव : राजुर, अहिल्यानगर, वडील शिक्षक होते.
शिक्षण : पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयात बीएएलएलबीचे शिक्षण. तिथूनच विद्यार्थी राजकारणाला सुरुवात
अकोले पंचायत समितीवर सदस्य म्हणून १९७२ ला निवड
१९७२ ते १९८० पंचायत समितीवर सभापती म्हणून निवड
१९८० पासून २००९ पर्यंत सलग ७ वेळेस आमदार म्हणून विधानसभेवर निवडून आले
१९९५ ते जुलै १९९९ या काळात विधानसभेचे विरोधी पक्षनेते पदाची धुरा सांभाळली होती.
राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाचे महाराष्ट्राचे अध्यक्ष म्हणूनही पिचड यांनी धुरा सांभाळली होती
मधुकर पिचड यांचा राजकीय प्रवास काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि त्यानंतर भाजप असा राहिला.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्थापनेपासून शरद पवार यांच्यासोबत होते, २०१४ ला अकोले मतदार संघात पुत्र वैभव पिचड यांना राष्ट्रवादीकडून निवडून आणले.
२०१९ ला पिचड यांनी आपल्या मुलासह भाजपात प्रवेश केला. त्यावेळी वैभव पिचड यांचा भाजपच्या तिकीटावर पराभव झाला.
मधुकर पिचड यांनी १९६१ मध्ये अमृत सागर दूध सहकारी संस्थेची स्थापना केली
मधुकर पिचड यांनी १९९३ मध्ये अगस्ती सहकारी साखर कारखाना स्थापन केला
आदिवासी विकास, भटक्या जमाती आणि इतर मागासवर्गीय कल्याण, प्रवास विकास आणि पशु, संवर्धन आणि मत्स्यव्यवसाय अशा विविध खात्यांची जबाबदारी पार पाडली.