Foreign Exchange Income | डाळी निर्यातीमधून देशाला 5,650 कोटींचे चलन

Nashik News । Foreign Exchange । 11 महिन्यांत सहा लाख 17 हजार मेट्रिक टनाची निर्यात
Bharat Brand Dal Phase
डाळीfile photo
Published on
Updated on

लासलगाव ( नाशिक ) : राकेश बोरा

जगात डाळींचा सर्वांत मोठा उत्पादक व निर्यातदार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भारताने एप्रिल २०२४ ते फेब्रुवारी २०२५ या ११ महिन्यांच्या कालावधीत सहा लाख १७ हजार ९७० मेट्रिक टन डाळी निर्यात करत पाच हजार ६५० कोटी रुपयांचे परकीय चलन मिळविले आहे. ही आकडेवारी केवळ उत्पादनक्षमताच नव्हे तर देशाच्या अन्न धोरणात बदलाचेही सूचक ठरत आहेत.

भारत हा डाळींचा सर्वांत मोठा उत्पादक देश असून, २०२२ मध्ये देशाने २५ दशलक्ष मेट्रिक टनांहून अधिक डाळींचे उत्पादन घेतले होते. हे जागतिक उत्पादनाच्या जवळपास २५ टक्के आहे. याचबरोबर, भारत हा डाळींचा सर्वांत मोठा ग्राहकही आहे. देशातील आहार संस्कृती, शाकाहारी लोकसंख्या आणि आरोग्य जागरूकता यामुळे डाळींची मागणी मोठ्या प्रमाणावर असते. डाळ उत्पादनात राज्यनिहाय मध्य प्रदेशचा २५ टक्के वाटा असून, महाराष्ट्राचा १७ टक्के वाटा आहे. या उत्पादनाचा काही भाग देशांतर्गत वापरासाठी राखून ठेवला जातो, तर उरलेला मोठा हिस्सा परदेशी बाजारपेठेत निर्यात केला जातो.

Bharat Brand Dal Phase
Chili Market Lasalgaon | लासलगावची मिरची आता थेट लंडन-दुबईच्या बाजारपेठेत

पोषण व पर्यावरणस्नेही पर्याय

मसूर, हरभरा, वाटाणे, उडीद, मूग आणि सोयाबीन यांसारख्या डाळींमध्ये प्रथिने, फायबर, लोह, जस्त आणि विविध जीवनसत्त्वे आढळतात. आरोग्य ट्रेंडनुसार, वनस्पती आधारित प्रथिनांची मागणी झपाट्याने वाढत आहे. ग्लूटेन- मुक्त, लो कार्ब आणि पर्यावरणपूरक आहार निवडणाऱ्यांसाठी डाळी आदर्श पर्याय मानल्या जात आहेत.

Bharat Brand Dal Phase
Nashik Grapes News | इस्त्रायल-हमास युद्धातही दीड लाख टन द्राक्षांची निर्यात

डाळी निर्यात अशी (मेट्रिक टनामध्ये)

  • २०२०-२१ : २ लाख ७६ हजार ८६३

  • २०२१-२२ : ३ लाख ८८ हजार ४०३

  • २०२२-२३ : ७ लाख ६२ हजार ८५२

  • २०२३-२४ : ५ लाख ९४ हजार १६४

निर्यातीतून मिळालेले चलन (कोटींमध्ये)

  • २०२०-२१ : १९७७

  • २०२१-२२ : २६८०

  • २०२२-२३ : ५३१२

  • २०२३-२४ : ५३३३

निर्यात वाढीची कारणे अशी

वनस्पती आधारित प्रथिनांबद्दल जागरूकता, शाश्वत शेती व पर्यावरणपूरक आहाराची निवड, वाढती शाकाहारी लोकसंख्या. भारतीय डाळींची गुणवत्ता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news