Malegaon FDA Gutka Raid | मालेगावात रोखली गुटखा तस्करी, 15 लाखांचा मुद्देमाल जप्त; तिघांविरुद्ध गुन्हा

Malegaon FDA Gutka Raid | रमजानपुरा पोलिसांची गुटखा तस्करीवर कारवाई
Gutkha Seized
पालघर पोलिसांकडून पाच महिन्यात ९७ लाखांचा गुटखा जप्तpudhari photo
Published on
Updated on

मालेगाव : पुढारी वृत्तसेवा

रमजानपुरा पोलिस ठाण्याच्या हद्दीत अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने पोलिसांच्या मदतीने केलेल्या संयुक्त कारवाईत प्रतिबंधित गुटखा, पानमसाला व सुगंधित तंबाखूचा मोठा साठा जप्त करण्यात आला. या कारवाईत एकूण १४ लाख ९९ हजार १३० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली असून, एक संशयित फरार आहे.

Gutkha Seized
Gutkha Smuggling : बोलेरो, रिक्षातून चालत होती गुटख्याची तस्करी

३० जून रोजी दुपारी साडेतीन वाजता कुसुंबा नवीन बसस्थानक मार्गावरील जत्रा हॉटेललगत रस्त्यावर ही कारवाई करण्यात आली. आरोपींकडील महिंद्रा पिकअप (एमएच ४१ एयू २५३९) या वाहनामध्ये प्लास्टिकच्या क्रेटच्या आड प्रतिबंधित गुटखा व तंबाखूजन्य पदार्थ लपवून शहरात विक्रीसाठी आणण्यात येत असल्याची माहिती मिळाल्यानंतर छापा टाकण्यात आला.

कारवाईत २ लाख ४० हजार रुपयांचा बिग पॅक विमल गुटखा, ५ लाख ८० हजार ८०० रुपयांचा विमल पानमसाला, १० हजार रुपयांचा व्ही-१ बिगू, १ लाख ४५ हजार २०० रुपयांचा व्ही-१ तसेच ५ लाख रुपयांची पिकअप, १७ हजार १३० रुपयांची रोकड व तीन हजार रुपयांचा मोबाइल असा एकूण १४ लाख ९९ हजार १३० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

Gutkha Seized
Gutkha smuggling : बुलढाण्यात गुटखा तस्करीचा पर्दाफाश! नाकाबंदीत ७० लाखांचा मुद्देमाल जप्त

जप्त केलेल्या मालाचे नमुने तपासणीसाठी अन्न व औषध प्रशासनाने ताब्यात घेतले. या प्रकरणी अन्न व औषध प्रशासनाच्या अन्नसुरक्षा अधिकारी सोनल संदीप पाडळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कामील शेख कलीम (रा. अक्सा कॉलनी, रमजानपुरा), शेख अशपाक शेख गफार (रा. इदू मुक्कादम चौक) यांना अटक करण्यात आली आहे.

तर शेख हयात शेख शकिल (रा. इस्लामाबाद, हयात मशिदीजवळ) हा फरार आहे. तिघांविरुद्ध रमजानपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटक केलेल्या कामील व अश्पाक यांना न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक डी. एन. चव्हाण करीत आहेत

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news