Nashik news | उच्चदाब विद्युत वाहिनीचा धक्का बसून बाप-लेकीचा मृत्यू, भाची गंभीर

Electric shock death| जखमी भाची हिला उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
Nashik news
Nashik news
Published on
Updated on

जळगाव: शहरातील अक्सानगर परिसर संतोषी माता मंदिर रस्त्यावर शुक्रवारी (दि.5) सकाळी १०.३० वाजेच्या सुमारास एक हृदयद्रावक घटना घडली. उच्चदाबाच्या विद्युत वाहिनीचा झटका बसल्याने बाप-लेकीचा मृत्यू झाला असून लहान भाची गंभीर जखमी झाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मास्टर कॉलनीजवळ असलेल्या अक्सानगर परिसरात मौलाना साबीर खान नवाज खान (वय-३६) हे पत्नी, आई, वडील आणि २ मुली, १ मुलासह राहतात. शुक्रवारी सकाळी १०.३० वाजेच्या सुमारास मोठी भाची मारिया फातेमाबी (वय-१२) हीचा घराच्या जवळ असलेल्या उच्चदाब विद्युत वाहिनीला स्पर्श झाला. त्यामुळे मारिया हिस विजेचा झटका बसल्याचे पाहून मामे बहीण आलिया (वय-१६) हिने तिला वाचवण्याचा प्रयत्न केला मात्र तिला देखील विजेचा झटका बसला.

दोन्ही मुली संकटात असल्याचे पाहून मौलाना साबीर खान यांनी धाव घेतली. ते देखील विद्युत वाहिनीच्या गर्तेत अडकले. उच्च दाब विद्युत वाहिनीचा जोरदार झटका बसल्यामुळे मौलाना साबीर खान, मुलगी आलिया यांचा जागीच मृत्यू झाला असून भाची मारिया फातिमा ही गंभीर जखमी झाली आहे. जखमी भाची हिला उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

दोघांचे मृतदेह जिल्हा सामान्य रुग्णालय आणि वैद्यकीय महाविद्यालय याठिकाणी आणण्यात आले आहेत. घटनेची माहिती मिळताच नातेवाईक आणि समाजातील नागरिकांनी जिल्हा रुग्णालयात गर्दी केली आहे. दरम्यान, महावितरणच्या हलगर्जीपणामुळे ही घटना घडली असल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. यावेळी जिल्हा सामान्य रुग्णालयात आमदार सुरेश भोळे यांनी भेट दिली. त्यावेळी उपविभागीय अधिकारी नितीन गणापुरे यांच्याकडे नागरिकांनी आपला रोष व्यक्त केला. यावेळी महावितरण चे अधिकाऱ्यांना आमदारांनी घराजवळील विद्युत प्रवाहाच्या तारेवर तात्काळ योग्य ती कारवाईच्या सूचना दिल्या.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news