Trimbakeshwar Dam Accident | भाऊबीजेच्या आनंदात काळाचा घाला; बेझे धरणात बुडून वडील आणि दोन मुलींचा दुर्दैवी मृत्यू

Trimbakeshwar Dam Accident | त्र्यंबकेश्वर तालुक्यातील दुर्दैवी घटना; पोहायला गेलेल्या एकाच कुटुंबातील तिघांचा बुडून अंत
Death
DeathPudhari
Published on: 
Updated on: 

त्र्यंबकेश्वर (पुढारी वृत्तसेवा):

इगतपुरी तालुक्यातील वाघेरा येथील रहिवासी व तिसगाव नाका, कल्याण फाटा, जिल्हा ठाणे येथील कुटुंबातील २ मुली आणि त्यांचे वडील अशा तिघांचा बेझे धरणात बुडून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे.

Death
Nashik Kalaram Temple | त्र्यंबकेश्वर, सप्तशृंगीसह काळाराम मंदिरात अतिरिक्त बंदोबस्त तैनात

त्र्यंबकेश्वर तालुक्यातील अंजनेरी येथील माहेरवासीण तिच्या दोन मुली आणि पतीसह भाऊबीजेच्या सणाला आली होती. बुधवारी (दि. ११) सकाळी १० च्या सुमारास बेझे धरणावर फिरायला गेले असता, दोन्ही मुली ज्योती सुरेश भोर (१०) आणि हर्पदा सुरेश भोर (७) या धरणातील पाण्यात उतरल्या होत्या. त्यांना पाण्याचा अंदाज न आल्याने त्या बुडायला लागल्या. हे पाहून वडील सुरेश नामदेव भोर (४४) हे त्यांना वाचवायला पाण्यात उतरले.

मात्र, त्यांनाही खोलीचा अंदाज आला नाही. तेदेखील पाण्यात बुडाले. ही बाब ग्रामस्थांच्या लक्षात येताच धावपळ उडाली. पाण्यात बुडालेल्यांचा पोहणाऱ्यांनी शोध घेतला. मात्र, तोपर्यंत उशीर झाला होता. दुपारी १२ च्या सुमारास तिघांचे मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात आले. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.