

Father Son Killed Accident in Manmad
नगरसुल: पिकअपने दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने पितापुत्राचा मृत्यू झाला. तर पुतण्या जखमी झाला. ही घटना आज (दि.१५) पहाटे पावणे चारच्या सुमारास मनमाड येथे घडली. किशोर ओंकार सोनवणे (वय ४०), मुलगा ऋतिक किशोर सोनवणे (वय ११) असे मृत पितापुत्राचे नाव आहे. तर रवींद्र बाळू सोनवणे (वय २७) असे जखमीचे नाव आहे. या घटनेमुळे वडाचामळा परिसरात शोककळा पसरली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, नगरसुल येथील वडाचामळा येथे बांधकाम कारागीर म्हणून राहत असलेले किशोर ओंकार सोनवणे (वय ४०), मुलगा ऋतिक किशोर सोनवणे (वय ११) , पुतण्या रवींद्र बाळू सोनवणे (वय २७) हे तिघेजण बुधवारी दुपारी नगरसुल येथून अंतापूर ताराबाद येथे गेले होते. आज पहाटे ते परतत असताना मनमाड येथे बोलेरो पिकअपने त्यांच्य़ा दुचाकीला पाठीमागून जोराची धडक दिली. यात पितापुत्राचा जागीच मृत्यू झाला. तर रवींद्र सोनवणे जखमी असून तत्काळ रुग्णालयात दाखल केले आहे.
नगरसुल वडाचा मळा परिसरात या घटनेमुळे शोककळा पसरली आहे. किशोर सोनवणे यांचे मूळ गाव गोल्हेवाडी असून ते जावई म्हणून येथे राहतात. ते बांधकाम कारागीर म्हणून प्रसिद्ध होते. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, मुले असा परिवार आहे. त्यांच्या अपघाती निधनावर हळहळ व्यक्त केली जात आहे.