Fastest Response Nashik city police : दिलासादायक! आपत्कालीन परिस्थितीत नाशिक पोलिसांचा सर्वात जलद प्रतिसाद

Police Help : सरासरी ४.५७ मिनिटांत पोलिसांची मदत
Dial 112 | Citizen Portal-Maharashtra
पोलीस सेवासाठी 'डायल ११२' अंतर्गत जलद कार्यपद्धती वापरली जात आहेpudhari file photo
Published on
Updated on

नाशिक : आपत्कालीन परिस्थितीत कुणी मदतीसाठी '११२' या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधल्यास नाशिक शहर पोलिस अवघ्या ४.५७ मिनिटांत संबंधितापर्यंत पोहोचतात. राज्यात सर्वाधिक जलद प्रतिसाद नाशिक शहर पोलिस दलामार्फत मिळत असल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. (The police have claimed that the fastest response in the state is being received through the Nashik city police force)

सन २०२१ मध्ये 'डायल ११२' उपक्रम सुरू झाला. सुरुवातीस या क्रमांकावर संपर्क साधल्यास संबंधितापर्यंत पोहोचण्यास नाशिक शहर पोलिसांना सरासरी १८ मिनिटांचा कालावधी लागत होता. तो आता अवघ्या ४.५७ मिनिटांवर आल्याने नागरिकांकडून त्याचे स्वागत होत आहे. नाशिक पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या आदेशानुसार 'सुरक्षित नाशिक' अंतर्गत सर्व पोलिस ठाणे व पथकांनी विविध स्वरूपाच्या कारवायांचा वेग वाढवला आहे.

त्यातच नागरिकांना त्वरित मदत करण्यासाठी 'डायल ११२'अंतर्गत जलद कार्यपद्धती वापरली जाते. चालू वर्षात सुरुवातीस पोलिसांचा प्रतिसाद देण्याचा वेळ ७.४६ मिनिटांपर्यंत होता. मात्र, पोलिस ताफ्यात नव्याने सहभागी झालेली वाहने, चालक, वाढते मनुष्यबळ यामुळे पोलिसांचा प्रतिसाद आणखी जलद झाला. राज्यस्तरावर पोलिस दलातून प्रत्येक महिन्याला आढावा घेण्यात येतो. त्यानुसार नाशिक पोलिस दल सर्वाधिक जलद प्रतिसाद देत असल्याची नोंद राज्य पोलिस दलाने केली आहे.

चालू वर्षातील प्रतिसाद (2024)

महिना --- कालावधी

  • जून --- ६ मिनिट

  • जुलै --- ५.४० मिनिट

  • ऑगस्ट --- ५.२३ मिनिट

  • सप्टेंबर --- ४.५७

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news