

नाशिकरोड : कौटुंबिक न्यायालयातील खटल्यांची वाढती संख्या या पार्श्वभूमीवर नाशिकरोड येथे अतिरिक्त कौटुंबिक न्यायालय सुरू करण्याची मागणी अनेक वर्षांपासून होत होती. अखेर गुरुवारी (दि. 18) येथे अतिरिक्त कौटुंबिक न्यायाधीश सुरेखा पाटील या रुजू झाल्याने ही मागणी पूर्ण झाली आहे.
यानिमित्त वकील संघाकडून न्यायाधीश पाटील यांचे स्वागत करण्यात आले. ॲड. नितीन पंडित, ॲड. भूषण बाजपेयी, ॲड. हृषिकेश कातकडे, ॲड. योगेश शिरसाट यांनी पाटील यांचे स्वागत केले. या प्रसंगी मुख्य न्यायधीश प्रसाद पालसिंगकर, नाशिकरोड बार कॉन्सिलचे अध्यक्ष ॲड. अशा देशमुख, उपाध्यक्ष शिरीश पाटील, ॲड, चैताली कुटे आदींसह वकिल उपस्थित होते.