

नाशिकः पर्यावरण रक्षणाच्या भूमिकेला कंपन्यांकडून व्यापक पाठिंबा दिला जात आहे. कंपन्यांकडून राबविल्या जात असलेल्या शाश्वतता (इएसजी) धोरणांमुळे कंपन्यांचे मुख्य वित्तीय अधिकारी अर्थात सीएफओंच्या भूमिकेत व्यापक बदल झाले असून अनेक कंपन्यांच्या धोरणात त्यांचे प्रतिबिबं पडताना दिसत आहे. विमा क्षेत्र या संक्रमणाचे आकर्षक उदाहरण ठरले असून ते आता हवामान जोखीम अंतर्भूत करत आहे. इएसजी धोरणाचे एकत्रीकरण हे महत्त्वाकांक्षी ध्येय राहिलेले नसून व्यवसायासाठी एक अत्यावश्यक बाब ठरली आहे.
केर्नी या जगप्रसिध्द संस्थेने नुकत्यात प्रसिध्द केलेल्या सर्वेक्षणरुपी अहवालात शाश्वततेच्या दृष्टीकोनातून राबविलेल्या उपक्रमांमधून पारंपारिक गुंतवणुकींपेक्षा अधिक परतावा मिळाला पाहिजे, अशी तब्बल ६९ टक्के कंपनी सीएफओंची धारणा असल्याचा मुद्दा नमूद करण्यात आलेला आहे.
इएसजी हा आता पर्याय राहिलेला नसून तो जबाबदार तसेच भविष्य-केंद्रित व्यवसायासाठी मार्गदर्शक ताकद ठरली आहे. एकेकाळी आर्थिक सचोटीचे प्रमुख संरक्षक असलेले सीएफओ आज वित्तीय धोरण आणि शाश्वतता यांचा मिलाफ झालेल्या जगतात कार्यरत आहेत.
दीर्घकालीन मूल्य प्रदान करणाऱ्या शाश्वत व्यवसायांना गुंतवणूकदार प्राधान्य देत आहेत, तर दुसरीकडे ग्राहक नैतिकतेच्या पातळीवर तसेच पर्यावरणाच्या दृष्टीकोनावर अधिकाधिक भर देणाऱ्या ब्रँडना पाठबळ देत आहेत. मायक्रोसॉफ्ट हे याचे प्रमुख उदाहरण ठरले आहे. २०३० पर्यंत कार्बन निगेटिव्ह होण्यासाठी वचनबद्ध असलेल्या मायक्रोसॉफ्टने इएसजी तत्त्वांचे प्रत्यक्षात अनुकरण केले.विमा कंपन्यांनी इएसजी धोरणांचा स्वीकार केला आहे.
विमा कंपन्या शिक्षण, निवृत्ती आणि संरक्षण यासारख्या जीवनातील निश्चिततांना संरक्षण प्रदान करतात, तर सीएफओ आर्थिक निश्चिततांना संरक्षण देतात. गुंतवणूकदार अशा कंपन्यांकडे दीर्घकालीन मूल्य निर्माण करणारे घटक म्हणून पाहतात. तर ग्राहक नैतिक तत्वे पाळणाऱ्या तसेच पर्यावरणला जपणाऱ्या कंपन्यांना प्राधान्य देत आहेत. मॅटेल या कंपनीने इएसजी योजनांमध्ये शाश्वततेला प्रोत्साहन दिल्याने तिच्या ग्राहकांच्या समाधानात 10 टक्के वाढ, कर्मचाऱ्यांच्या सहभागात 5 टक्के वाढ आणि समभागधारकांच्या मूल्यात 5 टक्के वाढ साध्य केली आहे.
असे आहे सीएफओचे नवीन युग! सीएफओ हे केवळ आर्थिक रणनीतीकार नव्हे तर शाश्वत परिवर्तनाचे शिल्पकार आहेत. नफ्याला उद्देशाशी जोडून, ते आर्थिक वाढ आणि पर्यावरणीय व्यवस्थापन या दोन्ही गोष्टींना महत्त्व देणाऱ्या आजच्या जगासाठी कॉर्पोरेट यशाची नव्याने व्याख्या तयार करत आहेत. ते शाश्वत भविष्याच्या ब्लूप्रिंटला आकारही देत आहेत.
केदार पत्की, चीफ फायनान्शिअल ऑफिसर, इंडिया फर्स्ट लाईफ