Maharashtra Chamber of Commerce Election | महाराष्ट्र चेंबरवर 'एकता'चे वर्चस्व

Maharashtra Chamber of Commerce Election | 'प्रगती'चा धुवाँ : वरिष्ठ उपाध्यक्ष, नाशिक, जळगाव, कोकणमध्ये विजय
Maharashtra Chamber election complaint
Maharashtra Chamber election complaint
Published on
Updated on

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

द्विवार्षिक निवडणुकीपेक्षा कोर्ट कचेऱ्यांनीच सर्वाधिक गाजलेल्या महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सच्या निवडणुकीत सत्ताधारी 'एकता' पॅनलने 'प्रगती' पॅनलचा धुवाँ उडवत निर्विवाद वर्चस्व मिळविले आहे. वरिष्ठ उपाध्यक्षपदासह नाशिक, जळगाव आणि कोकण विभागातील उपाध्यक्षपदावर दणदणीत विजय मिळविला. याशिवाय गव्हर्निंग कौन्सिलच्या सर्व जागांवर एकतर्फी विजय मिळवत महाराष्ट्र चेंबरवर विजयी झेंडा रोवला.

Maharashtra Chamber election complaint
FIFA World Cup : भांडी घासणारा.. पोस्टमन अन् नवख्यांची टोळी; 'या' 6 सामन्यांनी रडवलं होतं फुटबॉलच्या महासत्तांना!

मुंबई येथील महाराष्ट्र चेंबरच्या मुख्यालयात सोमवारी (दि. १५) मतमोजणीनंतर लगेचच निकाल जाहीर झाले. पहिल्या फेरीपासूनच एकता पॅनलने सरशी मिळवली. प्रगती पॅनलला वरिष्ठ उपाध्यक्षपदासह नाशिक विभागाच्या उपाध्यक्षपदाबाबत मोठ्या अपेक्षा होत्या. मात्र, मतदारांनी या दोन्ही उमेदवारांसह जळगाव, कोकण उपाध्यक्षपदाच्या उमेदवाराला तसेच मोजक्याच गव्हर्निंग कौन्सिलच्या उमेदवारांना सपशेल नाकारले.

एकताचे वरिष्ठ उपाध्यक्षपदाचे उमेदवार करुणाकर शेट्टी यांचा दणदणीत विजय झाला, तर प्रगतीच्या संगीता पाटील यांना दारुण पराभव पत्कारावा लागला. तीन फेऱ्यांतील पहिल्या फेरीपासून शेट्टी यांनी आघाडी मिळविली. त्यांनी राज्यभरात झालेल्या ३००३ मतदानांपैकी २३८५ इतके मते घेत विजय मिळविला. तर संगीता पाटील यांना अवघे ५०० मते मिळाली. तर ११८ मते बाद झाली.

नाशिक विभागाच्या उपाध्यक्षपदाचा देखील एकतर्फीच सामना रंगला. एकताच्या सुनीता फाल्गुने यांनी पहिल्या फेरीपासून प्रगतीच्या रतन पडवळ यांच्यावर आघाडी मिळविली. नाशिकसाठी ११५५ मतदान झाले होते. पैकी फाल्गुने यांनी ८६५ मते मिळवित विजय मिळविला. तर रतन पडवळ यांना अवघे २०१ मते मिळाली. तर ४९ मते बाद झाली. याशिवाय, जळगाव आणि कोकण उपाध्यक्षपदाचा देखील सामना एकतर्फी झाला.

जळगावतून एकताचे महेंद्र अग्रवाल यांनी प्रगतीच्या नितीन इंगळे यांचा पराभव केला. तर कोकणात एकताच्या संतोष राणे यांनी प्रगतीच्या भालचंद्र राऊत यांना धूळ चारली. याशिवाय, नाशिकमधील २७ गव्हर्निंग कौन्सिलच्या जागांवर एकताच्या सदस्यांनी ९०० पेक्षा अधिक मते मिळवित विजय मिळविला. सिंधुदुर्गमधील ७ गव्हर्निंग कौन्सिलच्या जागाही एकताने खेचून आणल्या. राज्यातील उर्वरित जागा अगोदरच बिनविरोध आल्याने, एकताने प्रगतीला चारही मुंड्या चित केल्याचे दिसून आले.

Maharashtra Chamber election complaint
MS Dhoni retirement | ‘कॅप्टन कूल’ची पावले निरोपाकडे...

संगीता पाटील होमटाऊनवरही धक्का

प्रगती पॅनलकडून वरिष्ठ उपाध्यक्षपदासाठी मैदानात उतरलेल्या संगीता पाटील यांना त्यांच्या होमटाऊनवर देखील मतांची आघाडी घेता आली नाही. त्यांना धुळे येथून अवघे ८३ मते मिळाली. तर त्यांचे प्रतिस्पर्धी शेट्टी यांना ११६ मते मिळाली. तर १२ मते बाद झाली. याशिवाय मतदानाच्या दिवशी त्या नाशिकमध्ये दोन दिवस तळ ठोकून होत्या. अशातही त्यांना नाशिकमधून अवघे २३० मते मिळाली. तर शेट्टी यांनी ८५४ मतांची आघाडी घेतली.

कांतीलाल चोपडा यांना धक्का

प्रगती पॅनलचे नेतृत्व कांतिलाल चोपडा यांनी ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची केली होती. नाशिक उपाध्यक्षपदासाठी ते इच्छुक होते. मात्र, त्यांचा उमेदवारी अर्ज बाद झाल्याने, रतन पडवळ यांना त्यांनी मैदानात उतरविले होते. मागील काही दिवसांपासून त्यांनी प्रचार देखील जोमाने केला. मात्र, मतदारांनी त्यांना सपशेल नाकारले. या निवडणुकीत त्यांना एकही उमेदवार निवडून आणता आला नसल्याने हा त्यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news