नाशिक : ईद-ए-मिलाद जुलूसनिमित्त भद्रकाली व नाशिकरोड परिसरातील वाहतूक मार्गात बदल करण्यात आला आहे. सोमवारी (दि.१६) शहरातील विविध भागामधून जुलूस निघणार असून, त्यात मोठ्या संख्येनी मुस्लिम बांधव सहभागी होणार आहेत. जुलूस मार्गावर वाहतुकीची कोंडी होवू नये, यासाठी काही मार्गावरील वाहतुक बंद करण्याबरोबरच पर्यायी मार्गाने वाहतुक वळविण्यात येणार आहे.
भद्रकाली परिसरातील चौक मंडई, बागवानपुरा, कथडा मस्जिद, शिवाजी चौक, मिरा दातार दर्गा, शिंपी गल्ली, आझाद चौक, चव्हाटा देवी मंदिर, सुभाष वाचनालय, बुधवार पेठ, आदमशहा दर्गा, संत नामदेव पथ, काझीपुरा पोलिस चौकी, कोकणीपुरा, उमराव मेडिकल, दुध बाजार (अब्दुल हमीद चौक), त्र्यंबक पोलिस चौकी, खडकाळी सिग्नल येथून वळण घेवून परत त्र्यंबक पोलिस चौकी, दुध बाजार (अब्दुल हमीद चौक), पिंजार घाट रस्त्याने बडी दर्गा येथे जुलूसचा समारोप करण्यात येणार आहे. तसेच नाशिकरोड परिसरातून बिटको चौक, अनुराधा चौक, सत्कार पॉईंटकडून देवळालीगाव मार्गे विहितगाव सिग्नल येथे फिरून बागुलनगर, देवळाली गाव नाशिक मनपा मैदान येथे समारोप होणार आहे.
सारडा सर्कल ते हाजी टी पॉईंटकडे जाणारी वाहतूक ही सारडा सर्कल ते वडाळा नाका, डावीकडे वळून मोठा राजवाडामार्गे इतरत्र जातील.
खडकाळी सिग्नल ते अब्दुल हमीद चौकाकडे जाणारी वाहतूक सारडा सर्कल ते वडाळा नाका, डावीकडे वळून मोठा राजवाडा मार्गे इतरत्र जातील.
शिवाजी चौक तते मिरादातार दर्ग्याकडे जाणारी वाहतूक शितळादेवी, कुंभारवाडामार्गे इतरत्र जातील.
देवळाली कॅम्पकडे जाणारी वाहतूक दत्तमंदिर सिग्नल येथून उजवीकडे वळून दत्त मंदिर, सुराणा हॉस्पिटल आर्टिलरी सेंटर रोड, खोळे मळा, रोकडोबा वाडी, विहितगाव मार्गे जातील.
देवळाली कॅम्पकडून बिटको सिग्नलकडे विहितगाव सिग्नल येथून डावीकडे वळून वडनेर रोडने रोकडोबा वाडी आर्टिलरी सेंटर रोड, सुराणा हॉस्पिटल, दत्तमंदिर रोड, दत्तमंदिर सिग्नल मार्गाने जातील.
नाशिकरोडकडून पुण्याकडे जाणारी येणारी सर्व प्रकारची जड व अवजड वाहतूक वीर सावरकर उड्डाणपुलावरून जातील.