Nashik Ashok Kharat case | प्रतिभा चाकणकरांना समन्स

घोस्ट अकाऊंट : मुलगा तन्मयचीही होणार ईडीकडून चौकशी
Nashik Ashok Kharat case | प्रतिभा चाकणकरांना समन्स
Published on
Updated on

नाशिक : भोंदू अशोक खरात प्रकरणात ईडीने एंट्री केल्यापासून चाकणकर भगिनींच्या अडचणी वाढत आहेत. प्रतिभा चाकणकर यांच्या नावे असलेल्या घोस्ट अकाऊंटमधून झालेल्या संशयास्पद व्यवहार प्रकरणी ईडीने प्रतिभा चाकणकर यांना समन्स बजावले आहे. त्यांचा मुलगा तन्मय चाकणकर यालाही समन्स बजावले असून, त्याचीही चौकशी होणार आहे. प्रतिभा चाकणकर या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या नेत्या व महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्या बहीण आहेत.

Nashik Ashok Kharat case | प्रतिभा चाकणकरांना समन्स
Nashik IT Company Conversion Case | धर्मांधता अन् त्यातून शोषण हे अस्वीकारार्हच !

अशोक खरात मनी लाँड्रिंग प्रकरणात ७० कोटी रुपयांच्या घोस्ट अकाऊंटचा उलगडा झाला आहे. त्यामुळे ईडीने तपासाला वेग दिला असून, प्रतिभा आणि तन्मय चाकणकर या दोघांनाही पुढील आठवड्यात चौकशीसाठी बोलावले आहे. समता नागरी सहकारी पतसंस्थेत चार खात्यांतून १ कोटी २० लाख ते २ कोटी ४० लाख रुपयांचे आर्थिक व्यवहार झाले आहेत. हे सर्व बँक अकाऊंट्स अशोक खरातशी संबंधित होते. १३४ हून अधिक प्रॉक्सी अकाऊंट्स खरात चालवत होता असा आरोप आहे. या सर्व खात्यांचा नॉमिनी खरात होता. ही सगळी खाती उघडताना एकाच मोबाईलचा वापर करण्यात आला होता. या प्रकरणात पतसंस्थेचे संचालक संदीप कोयते यांचीही चौकशी करण्यात आली. एकाच मोबाईल नंबरवर आणि नॉमिनीवर अनेक खाती उघडली गेली असताना बँकेने कोणतीही रेड फ्लॅग प्रणाली का लागू केली नाही, याबाबत ईडी चौकशी करत आहे.

Nashik Ashok Kharat case | प्रतिभा चाकणकरांना समन्स
Ashok Kharat Nashik Case | 'चौकशीपेक्षा मरण परवडेल!'; सततच्या चौकशीमुळे भोंदू अशोक खरात मानसिकदृष्ट्या खचला

खाती बनावट असल्याचा दावा

गेल्या महिन्यात शिर्डी पोलिसांनी प्रतिभा चाकणकर यांची याच प्रकरणात आठ तास चौकशी केली होती. त्यावेळी प्रतिभा चाकणकर यांनी चौकशीनंतर माध्यमांशी संवाद साधताना, सर्व आरोपांचे खंडन केले होते. संबंधित खाती बनावट असल्याचा दावा केला होता. त्यांना कोणतीही माहिती न देता, बनावट स्वाक्षऱ्यांचा वापर करत ही खाती उघडण्यात आल्याचा दावा त्यांनी केला होता. आता ईडीने त्यांना समन्स बजावल्याने, चाकणकर यांच्या अडचणी वाढल्या आहेत.

Nashik Ashok Kharat case | प्रतिभा चाकणकरांना समन्स
Ashok Kharat Case | भोंदू खरातचे साम्राज्य ईडी घेणार ताब्यात

चाकणकर कुटुंबीयांच्या अडचणीत वाढ

तपासात २०२२ ते २०२४ दरम्यान ७० कोटी रुपयांहून अधिक संशयित व्यवहार आढळले आहेत. अशोक खरातने धार्मिक कार्याच्या नावाखाली लोकांकडून आधार आणि पॅनसारखी कागदपत्रे गोळा करत त्यांचा गैरवापर केल्याचा आरोप आहे. या कागदपत्रांच्या आधारे अनेक बेनामी आणि घोस्ट अकाऊंट्स उघडण्यात आले. ज्यांचा वापर पैशांची लेयरिंग करण्यासाठी करण्यात आला. खरातची गुन्हेगारी प्रवृत्ती आणि चाकणकर भगिनींशी असलेले त्याचे आर्थिक धागेदोरे यामुळे चाकणकर कुटुंबीयांच्या अडचणीत वाढीची शक्यता आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news