E-Hakka Pranali Maharashtra : राज्यात ई-हक्क प्रणालीत नाशिक, पुणे आघाडीवर

10 लाख अर्ज : तलाठी कार्यालयावरचा भार कमी
E-Hakka Pranali Maharashtra
E-Hakka Pranali Maharashtra Pudhari News Network
Published on
Updated on

नाशिक : प्रफुल्ल पवार

राज्यात ई-हक्क प्रणालीचा वापर मोठ्या प्रमाणात होत असून राज्यात तब्बल १० लाखाहून अधिक नागरिकांनी आपले अर्ज दाखल केले आहे. नाशिक विभागातून ४ लाख ७३ हजार अर्ज दाखल झाले आहे.

ई-हक्क प्रणालीतून जमीन खरेदी-विक्री नोंदी, नावे लावणे-काढणे, मृत्यूची नोंद अशा कामांसाठी यापूर्वी नागरिकांना वारंवार तलाठी कार्यालयाचे उंबरठे झिजवावे लागत होते. या समस्यांवर तोडगा म्हणून राज्य शासनाने दोन वर्षांपूर्वी ई-हक्क प्रणाली सुरू केली. या प्रणालीचा सर्वाधिक लाभ ४ लाख ७३ हजार १७५ इतके अर्ज नाशिक विभागातील नागरिकांनी घेतला आहे. पाठोपाठ पुणे विभागातून ३ लाख २१ हजार २१३ इतके अर्ज दाखल झाले आहे. इ-हक्क प्रणालीत नाशिक विभागाने चांगलीच भरारी घेतली आहे.

या होत्या समस्या

तलाठी, नागरिकांत वाद वाढले वाढत असल्याने आर्थिक व्यवहार होत होते. नागरिक व शेतकऱ्यांची कामे प्रलंबित राहत असल्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कारवाया वाढल्या होत्या. तलाठ्यांना इतर शासकीय कामांसाठी वेळ मिळत नव्हता. या सर्व समस्यांवर उपाय म्हणून ई-हक्क प्रणाली राबवण्यात आली.

यामुळे अर्जांत वाढ

  • तलाठी कार्यालयात जाण्याची गरज कमी

  • शेतकरी व नागरिकांच्या पैसा व वेळेत बचत

  • कर्ज प्रकरणांची प्रक्रिया सुलभ

  • आर्थिक व्यवहारांना बसला आळा

  • तलाठ्यांना इतर शासकीय कामांसाठी मिळणार वेळ

  • नागरिकांना घरबसल्या सुविधा उपलब्ध

या प्रणालीतून होतात ही कामे

  • ई - करार

  • बोजा चढवणे-गहाणखत

  • बोजा कमी करणे

  • वारस नोंद

  • मृत्यू नोंद (नावे कमी करणे)

  • अ.पा.क शेरा कमी करणे

  • ए कु में नोंद कमी करणे

  • विश्वस्तांचे नावे बदलणे

  • खातेदाराची माहिती भरणे

  • हस्तलिखित व संगणीकृत सातबारा दुरुस्ती

  • मयत कुळाची वारस नोंद

ई-हक्क प्रणालीमुळे समस्या

  • ई-हक्क प्रणालीत वारंवार तांत्रिक बिघाड

  • सर्व्हर डाऊन राहिल्याने अर्ज प्रक्रिया रखडणे

  • फेरफार नोंदी वेळेत मंजूर न होणे

  • जमीन खरेदी - विक्री व्यवहारांना विलंब

  • अर्ज करताना माहिती अपलोड होण्यात अडथळे

  • प्रणाली वापरण्याबाबत मार्गदर्शनाचा अभाव

  • प्रणालीत सुधारणा करण्याची मागणी

शासनाने ई-हक्क प्रणालीमुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात फायदा होत आहे. नागरिकांच्या समस्या सोडवल्या जात आहे. नागरिकांनी जास्तीत जास्त या प्रणालीचा लाभ घ्यावा.

विठ्ठल सोनवणे, सहाय्यक आयुक्त,

राज्यात यशस्वी अंमलबजावणी

  • दाखल अर्ज - १०,२७,५४३

  • स्वीकृत अर्ज - ८,१७,५३८

  • त्रुटी पूर्ततेसाठी परत अर्ज - १,९८,३३२

  • ग्राम अधिकाऱ्यांकडे प्रलंबित अर्ज - १०,६७३

राज्यातील विभागीय आकडेवारी अशी...

  • अमरावती - १,२२,३४७

  • कोकण (मुंबई) - २४३३८

  • छत्रपती संभाजीनगर - ३७,२६०

  • नागपूर - ४८,२१०

  • नाशिक - ४,७३,१७५

  • पुणे - ३,२१,२१३

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news