द्वारका अपघातातील मृतांची संख्या नऊ; जखमी राहुल साबळेचा उपचारादरम्यान मृत्यू

Nashik Accident | भाविकांच्या टेम्पोला झाला होता अपघात
Nashik Accident
जखमी राहुल साबळेचा उपचारादरम्यान मृत्यूPudhari
Published on
Updated on

सिडको : मुंबई-आग्रा महामार्गावर द्वारका चौफुली जवळ गेल्या रविवारी झालेल्या अपघातात गंभीर जखमी असलेला राहुल साबळे ( वय १७ ) या विद्यार्थ्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्याच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू होते. या अपघातातील मृतांची संख्या नऊ झाली आहे . घरातील एकुलता असलेल्या मुलाचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

सह्याद्री नगर भागातील एका नागरिकांच्या धार्मिक कार्यक्रम आटोपून घरी परतत असताना रविवारी भाविकांच्या टेम्पोला अपघात होऊन ८ जणांचा मृत्यू झाला होता. या भीषण अपघातात गंभीर जखमी असलेला राहुल साबळे ( वय १७, रा. सहयाद्रीनगर , सिडको ) याच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू होते. दरम्यान मृत्यूशी झुंज देत असताना शुक्रवारी (दि.१७) रात्री उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या अपघातात यापूर्वी पिता-पुत्रासह सख्ख्या भावांचा मृत्यू झाल्याची घटना घडलेली आहे. मृत राहुल हा इयत्ता १२ वी मध्ये शिकत होता.राहुल चे वडील बिगारीचे काम करतात तर आई लोकांची धुणे-भांडी करते. घरातील एकुलता असलेल्या तरूण मुलाचा मृत्यू झाल्याने कुटुंबावर दु:खाचा डोगर कोसळला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news