Gram Panchayat Elections | ग्रामपंचायत निवडणुकांवर राहणार दुष्काळाचे सावट

Gram Panchayat Elections | निवडणुका पुन्हा लांबणीवर पडण्याची शक्यता
Gram Panchayat Election
Gram Panchayat Electionfile photo
Published on: 
Updated on: 

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

राज्यात यंदा निर्माण झालेल्या भीषण दुष्काळी परिस्थितीचे सावट आता थेट स्थानिक स्वराज्य संस्थांच्या राजकीय घडामोडींवर आणि ग्रामीण राजकारणावर पडले आहे. राज्य सरकारने ३५८ पैकी तब्बल २६५ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर केल्यामुळे, पाणीटंचाई व शेतीच्या गंभीर प्रश्नांनी ग्रामीण जनता होरपळून निघत आहे.

Gram Panchayat Election
Nashik Market Committee | नाशिक बाजार समितीवर 37 वर्षांनंतर अशासकीय प्रशासक मंडळ; अध्यक्षपदी गणेश गिते यांची निवड!

या पार्श्वभूमीवर आगामी ग्रामपंचायत निवडणुका तातडीने पुढे ढकलण्यात याव्यात, अशी तीव्र मागणी राजकीय नेत्यांसह ग्रामीण भागातून जोर धरू लागली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील ६२१ ग्रामपंचायतींच्या निवडणुका लांबणीवर पडण्याची शक्यता आहे.
राज्यात पाण्याचे दुर्भिक्ष, चारा तुटवडा आणि शेतीचा अतोनात नुकसानामुळे शेतकरी व शेतमजूर मेटाकुटीस आले आहेत. रोजच्या जगण्यासाठी व पाण्यासाठी होणारा संघर्ष पाहता, निवडणूक लढवणे व मतदान करणे हा नागरिकांसाठी दुय्यम मुद्दा झाला आहे.

सद्यःस्थितीत संपूर्ण सरकारी यंत्रणा टँकरद्वारे पाणीपुरवठा करणे, छावण्या उभारणे आणि दुष्काळ निवारणाच्या उपाययोजना राबवण्यात व्यग्र आहे. अशा वेळी निवडणूक प्रक्रियेत अधिकारी व कर्मचाऱ्यांना गुंतवणे व्यवहार्य ठरणार नाही. अनेक गावांमध्ये पाण्याच्या टंचाईमुळे शेतमजूर आणि शेतकरी कुटुंबांचे स्थलांतर सुरू झाले आहे.

त्यामुळे मतदानाचा टक्का कमालीचा घसरण्याची भीती व्यक्त होत आहे. मतदारायाद्यांचे विशेष पुनरीक्षण (एसआयआर) आणि विविध तांत्रिक कारणांमुळे आधीच शेकडो ग्रामपंचायतींवर प्रशासकांची नियुक्ती झाली आहे. आता दुष्काळामुळे निवडणुका पुन्हा लांबणीवर पडल्यास गावांमधील प्रशासकीय राजवट आणखी लांबणार असून, लोकप्रतिनिधींअभावी स्थानिक पातळीवरील प्रश्न सुटणे कठीण झाले आहे.

Gram Panchayat Election
Mahajyoti Nashik center land-महाज्योतीच्या नाशिक केंद्रासाठी दिंडोरी रोडवर २ हेक्टर जागा

लोकप्रतिनिधी अन् पक्षांची मागणी:

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शशिकांत शिंदे यांच्यासह अनेक लोकप्रतिनिधींनी राज्य सरकार व निवडणूक आयोगाकडे दुष्काळी परिस्थिती सुधारेपर्यंत म्हणजे ऑक्टोबर - नोव्हेंबरनंतरच या निवडणुका घेण्याची विनंती केली आहे. सध्याचे प्राधान्य निवडणुकांचे नसून, नागरिकांना पिण्याचे पाणी आणि जनावरांना चारा पुरवण्याचे आहे,

असे मत राजकीय वर्तुळातून व्यक्त होत आहे. दुष्काळामुळे ग्रामपंचायतींचा निधी पाणीपुरवठा योजनांकडे वळवावा लागत असल्याने इतर नियमित विकासकामे पूर्णपणे ठप्प झाली आहेत. त्यामुळे परिस्थिती पूर्वपदावर आल्याशिवाय किंवा प्रशासकीय यंत्रणेला दिलासा मिळाल्याशिवाय निवडणुका घेणे योग्य ठरणार नाही, असा सूर संपूर्ण राज्यातून उमटत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news