

नाशिक : विधानसभेची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून मध्य नाशिक मतदारसंघाच्या आमदार देवयानी फरांदे यांच्यावर ड्रग्जसंदर्भातील काही गंभीर आरोप विरोधकांकडून करण्यात येत आहेत. प्रत्यक्षात वस्तुस्थिती जाणून घेतल्यास यामागेही फेक नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न होत असल्याचे दिसून येते. फरांदे यांनी नाशिक ड्रग्जमुक्त करण्यासाठी पोलिसांकडे केलेला पाठपुरावा, विधिमंडळाच्या सलग चार अधिवेशनांमध्ये अतिशय प्रखरतेने मांडलेली भूमिका यामुळे ड्रग्जमाफियांची पळता भुई थोडी झाली. त्या भीतीपोटीच विरोधकांना हाताशी धरून आता फेक नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न फरांदेंच्या बाबतीत होत आहे.
पुणे, मुंबईनंतर नाशिक हे ड्रग्जतस्करांचे माहेरघर बनू पाहात आहे. केवळ कॉलेजमधीलच नव्हे, तर शाळकरी विद्यार्थीही ड्रग्जच्या आहारी जात आहेत. या पार्श्वभूमीवर सलग चार अधिवेशनांमध्ये मध्य नाशिक मतदारसंघाच्या आमदार प्रा. देवयानी फरांदे यांनी ड्रग्जमुक्त नाशिकसाठी प्रयत्न होणे गरजेचे असल्याचे ठासून सांगितले होते. त्या केवळ भाषणे करून थांबल्या नाहीत, तर त्यांनी ड्रग्ज पेडलर्सचे नाव, त्यांचे फोन नंबर्स, त्यासंदर्भातील पुरावे हे गृहखात्याच्या अधिकार्यांना दिले. या प्रकरणाची चौकशीदेखील गृहखात्याच्या माध्यमातून करण्यास सांगितले. या विषयांवर सातत्याने आवाज उठवत असल्यामुळे विरोधी गटातील काही नेत्यांचे पोटशूळ उठले. त्यांनी प्रा. फरांदे यांना जाणीवपूर्वक टार्गेट करीत त्यांनी ड्रग्जविरोधात आवाज उठवणे बंद करावे, यासाठी प्रयत्न सुरू केले. त्यासाठी फरांदे यांची बदनामीही करण्यात आली. ही मंडळी विधानसभा निवडणूक प्रचारात तर हाच एक फेक नॅरेटिव्ह सेट करण्याच्या इराद्याने प्रचार करीत आहेत. इतकेच नव्हे, तर मुंबईतील काही नेत्यांकडूनही फरांदेंना टार्गेट करण्यात आले. यात सुषमा अंधारेंचेही नाव घेतले जाते. त्यांच्या विरोधात कायद्याप्रमाणे हक्कभंगाचा प्रस्तावही फरांदे यांनी अधिवेशनात सादर केला होता. विरोधकांच्या षडयंत्रांना न घाबरता फरांदे यांचा लढा सुरूच आहे. काही महिन्यांपूर्वीच त्यांनी पोलिस आयुक्तांना पत्र देत ड्रग्जमुक्त नाशिकसाठी प्रयत्न करण्याची गरज व्यक्त केली. नाशिक शहरात हुक्का पार्लरदेखील मोठ्या प्रमाणावर सुरू असून, त्यांच्यावरदेखील कायदेशीर कारवाई करण्याची मागणी देवयानी फरांदे यांनी केली. त्याचप्रमाणे जुगार (बॉल गेम) यासारखे अनैतिक खेळांचे अड्डे खुलेपणाने मुंबई नाका परिसरात सुरू आहेत. या अनैतिक धंद्यांकडे पोलिस प्रशासनाचे लक्ष वेधत त्यांच्या निदर्शनास आणून दिल्याचे आमदार फरांदे सांगितले.
सोशल मीडिया किंवा इतर प्रसार माध्यमांमध्ये कोणत्याही गोष्टीची खात्री न करता चुकीची माहिती प्रसारित करून अफवा पसरवू नये. याबाबत दक्षता घ्यावी, असे आवाहन नाशिक पोलिस आयुक्तालयातर्फे सहायक पोलिस आयुक्त संदीप मिटके यांनी केले आहे.