Devendra Fadnavis | पुरावे सापडले तर कोणालाही सोडणार नाही : मुख्यमंत्री

Devendra Fadnavis | भोंदूबाबा प्रकरणः अशोक खरातविरोधात आठ गुन्हे दाखल
Devendra Fadnavis
Devendra Fadnavis(Pudhari Photo)
Published on
Updated on

मुंबई : पुढारी वृत्तसेवा

कोणत्याही व्यक्तीचा फोटो किंवा संबंध यावरून गुन्हा सिद्ध होत नाही. मात्र, डिजिटल पुराव्यांच्या आधारे तपास सुरू असून ज्यांच्याविरुद्ध पुरावे मिळतील त्यांच्यावर कारवाई केली जाईल. त्यामध्ये वरिष्ठ अधिकारी आणि राजकीय व्यक्तींचा जरी संबंध आढळून आला तर त्यांनाही सोडणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली.

Devendra Fadnavis
Ashok Kharat Nashik Case | भोंदू खरातची कोर्टात पाच वाक्ये; म्हणाला, 'अशी मला साप, वाघ याबाबत माहिती नाही'

या प्रकरणात जर कोणी पोलिसांवर दबाव आणला किंवा हस्तक्षेप केला तर त्यांनाही पाठीशी घालणार नाही, असा इशाराही त्यांनी मंगळवारी विधानसभेत दिला. मुख्यमंत्री फडणवीस यांनी भोंदुबाबा खरातविषयी विधानसभेत निवेदन केले.

अनेक राजकारण्यांचे, आयपीएस, आयएएस आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांचे खरातसोबत फोटो असल्याने तपासात हस्तक्षेप केला जाण्याची भीती विरोधकांनी व्यक्त केली. तसेच निवृत्त न्यायाधीशांच्या देखरेखित तपास करा, अशी मागणी केली. ती फडणवीस यांनी फेटाळून लावली.

आपण राजकारणात आहोत, कोणाचा फोटो कोणासोबत आहे यावरून तो आरोपी होत नाही, असे मुख्यमंत्री म्हणाले. भोंदूबाबा खरातच्या मोबाईलची फॉरेन्सिक तपासणी सुरू असून डेटा रिट्रिव्ह करण्याचे काम सुरू आहे. मुंबईतील फॉरेन्सिक लॅबमध्ये त्याच्या मोबाईलमधून डिलिट केलेला डेटाही मिळविण्याचे काम सुरू आहे. यातून त्याला कुणी संपर्क केला आहे का? कुणी मेसेज केले आहेत? याची माहिती समोर येईल, असे मुख्यमंत्री म्हणाले.

व्हिडिओतून धक्कादायक प्रकार

या प्रकरणातील राजेंद्र जासूद याला अटकपूर्व जामीन मंजूर मिळाला आहे. परंतु १८ फेब्रुवारी २०२६ रोजी शिर्डी येथे एका महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार नीरज जाधव याने एआय जनरेटेड फोटो पाठवून व्हायरल करण्याची धमकी दिल्याचा आरोप सदर गुन्ह्यात होता. या गुन्ह्यांची दखल घेत, संबंधित फोटो त्याने नंतर डिलीट केला असला तरी त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Devendra Fadnavis
Aryaman Birla RCB Chairman|कोण आहेत RCB चे नवे चेअरमन आर्यमान बिर्ला? एकेकाळी IPL लिलावात राजस्थान रॉयल्सने लावली होती बोली!

मात्र, तक्रारदार महिलेने तपासासाठी मोबाइल सादर न केल्याने तपासात अडचणी येत होत्या. याबाबत सुरक्षेची हमी देत विश्वास दिल्यामुळे धक्कादायक व्हिडीओ बाहेर आले असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात दिली. या तपासादरम्यान योगेश भालेराव याने पोलिसांना काही व्हिडिओ दाखवले.

त्यात ८ महिलांचे काही व्हिडिओ समोर आले असून त्यामध्ये खरातने भोंदुगिरी, जादू‌टोणा करून महिलांचे शारीरिक शोषण केल्याचे दिसून आले आहे. सुरुवातीला भीतीपोटी साक्षीदार व्हिडिओ देण्यास तयार नव्हता, मात्र, पोलिसांनी सुरक्षा देऊन हे व्हिडिओ ताब्यात घेतले असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news