

नाशिक: नाशिकच्या देवळाली ते लहवीत रेल्वे स्थानकादरम्यान रविवार (दि.28) रोजी एका मालगडीचे ब्रेक नादुरुस्त झाल्याने गेल्या 1 ते दीड तासापासून रेल्वे वाहतुक ठप्प झाली. त्यामुळे वंदे भारत एक्स्प्रेस, तपोवन एक्स्प्रेस देवळाली कॅम्पजवळ सुमारे दोन तास अडकून पडल्या. सांयकाळी वाहतूक पुर्ववत सुरु झाली.
मालगाडीच्या प्रेशर पाईपमध्ये बिघाड झाल्याने परिणामी या मार्गावर लांब पल्ल्याच्या रेल्वे खोळंबल्या होत्या. त्यामध्ये वंदे भारत, तपोवन एक्सप्रेस, आणि इतर लांब पल्ल्याच्या गाड्या जवळपास एक ते दीड तासांपासून उशिराने धावल्या. मालागडीचे ब्रेक दुरुस्त करण्यासाठी तब्बल 2 तास लागल्याने प्रवाशांचे हाल झाले.
ट्रकवर पाणी साचले
दुसरीकडे नाशिक आणि परिसरातील मुसळधार पावसाचा फटका रेल्वे वाहतुकीला बसला आहे. परिणामी नाशिकच्या नांदगाव रेल्वे स्थानक परिसरात दोन प्रवासी गाड्या थांबवल्या आहेत. यात धुळे - दादर एक्सप्रेस आणि देवळाली भुसावळ पॅसेंजर नांदगाव रेल्वे स्थानकात दोन तास उशिराने धावली. रेल्वे ट्रकवर पाणी साचल्याने रेल्वे वाहतूक खोळंबली आहे.
मुसळधार पावसाचा परिणाम
राज्यात पुन्हा पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. अशातच या मुसळधार पावसाचा फटका रेल्वे वाहतुकीवर देखील पडला आहे. मुसळधार पावसामुळे दक्षिण-मध्ये रेल्वेच्या वाहतूकीवर परिणाम झाला आहे. यात गंगाखेड-वडगाव निळा दरम्यान रूळ बसल्यामुळे जवळपास 11 गाड्या रद्द झाल्या आहेत. तर 9 गाड्यांचा मार्ग बदलण्यात आला आहे.
तातडीने दुरुस्ती
नांदगाव येथे पाण्याचा प्रवाह कमी झाला आणि लगेच वाहतूक सुरळीत सुरु झाली. तर लहावीत येथे मालगाडीत तांत्रिक बिघाड झाल्याने अधिकारी आणि कर्मचारी तातडीने बिघाड दुरुस्त केला. गाड्यांना दीड तास विलंब झाल्याचे रेल्वे प्रशासनातर्फे स्पष्ट करण्यात आले.